श्री तांबडी जोगेश्वरी गणपती ( मनाचा दूसरा गणपती ) बुधवार पेठ - पुणे बुधवार पेठेत अप्पा बळवंत चौकाजवळ ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी देवीमंदिर आहे. सध्या भर वस्तीत असलेला काही शतकांपूर्वी पुणे अगदीच छोटे गाव असताना हा भाग गावाबाहेर लांब होता. तेव्हा या भागातून आंबील ओढा वहात असे. त्याकाळी ओढ्याकाठी देवीची मूर्ती होती. देवीचे मंदिर पेशवेकालीन असावे. काही वर्षांपूर्वी शेंदराचे कवच निखळल्यावर देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन झाले. देवीची मूळ मूर्ती चतुर्भुज असून उभी आहे. योगेश्वरीचे म्हणजेच जोगेश्वरीचे उल्लेख पुराणातही सापडतात. महिषासूराच्या बारा सेनापतींपैकी देवीने ताम्रासुराचा वध केला म्हणून ताम्रवर्णी योगेश्वरी म्हणजेच 'तांबडी जोगेश्वरी' नाव पडले असे म्हटले जाते. देवी शेंदुरलिप्त असते म्हणूनही तांबडी जोगेश्वरी म्हटले जाते. श्रीमंत पेशवे येथे देवी दर्शनास येत असत. अशा या ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी देवीच्या गणेश मंडळास पुण्याच्या गणेशोत्सवात मानाचे दुसरे स्थान प्राप्त झाले आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सव मंडळाने साजरे केले आहे. सुरुवातीला देवीच्या मंदिरातील विष्णू मंदिरासमोरील ज...