Skip to main content

Posts

Showing posts with the label Mahatma Phule Mandai

महात्मा फुले मंडई , पुणे / Mahatma Phule Mandai , Pune

महात्मा फुले मंडई , पुणे   " पुणे तिथे काय उणे " ही म्हण अगदी सार्थ आहे! काळानुसार सांगायचं तर पाताळेश्वर, कसबा गणपती, जोगेश्वरी, पर्वती, शनिवारवाडा असे जुनेपणाचे टप्पे सांगता येतील. पण पुणेकर मंडईला कधीच विसरू शकणार नाहीत. का तर ती त्यांची अन्नदाता आहे. मंडई होण्यापूर्वी बाजारहाट वगैरे शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात भरत असे. मंडई नव्हती तेव्हा तिच्या जागी खाजगीवाले यांची चारएक एकर जागा मोकळी पडून होती. पुण्याची वाढती लोकसंख्या आणि गरजा ध्यानी घेऊन नगरपालिकेने 1882 साली मंडई उभारण्याचा ठराव केला. त्याला महात्मा फुले, हरि रावजी चिपळूणकर अशा काही सभासदांनी विरोध केला. मंडई उभारणीला अडीच-तीन लाखांचा जो खर्च येईल तो शिक्षणकार्यासाठी खर्च करावा अशी त्यांची भूमिका होती. पण ठराव मंडईच्या बाजूने बहुमताने संमत झाला आणि बांधकामाला सुरुवात झाली. वासुदेव बापूजी कानिटकर या कंत्राटदारांकडे काम सोपवण्यात आले. कानिटकर हे अनुभवी कंत्राटदार होते. त्यांनी पुणे नगर वाचन मंदिर , आनंदाश्रम, फर्ग्युसन कॉलेज अशी " भव्य " कामे त्याआधी केलेली होती. कानिटकर कॉंण्ट्रॅक्ट मिळताच कामा...