पावसाळ्यात हरिश्चंद्रगड ट्रेकला जात आहात ? हे वाचून जा... पुण्यात बाहेरुन येऊन कंपनीत काम करणारी सात आठ पोरं 1 तारखेला सुट्टी आहे म्हणुन सोशल मिडीयावर रील्स बघुन हरीश्चंद्रगड ला जातात. खिरेश्वर मार्गे दुपारी तीन च्या आसपास गड चढायला लागतात. पास सहा वाजले तरी आपण गडावर का पोहोचत नाही हे लक्षात येत. हरीश्चंद्र गडाचा घेरा भयंकर मोठा त्यात पर्जन्यकाळी भयंकर पाऊस, धुक्याची दाट-दडप चादर, गवत प्रचंड माजलेलं असल्याने पायवाटा या काळात गायब होतात. अशात ही पोरं रस्ता चुकतात. फोन ला नेटवर्क नाही. अशातच रात्र होते. अंधार पडतो.सोबत खायला-प्यायला नाही. सोबत रेनकोट नाही वरुन पाउस चालु गारटा वाढतो. रात्रभर जागीच बसुन काढतात. दुसरा दिवस पण तसाच जातो ना रस्ता सापडतो ना कोणी भेटतो. शरीरात त्राण राहत नाही. विषय जिवाशी येतो. ऊपाशी पोटी कीती राहणार ना वरुन मुसळधार पाऊस,असह्य थंडी,हातभर अंतरावरच दिसणार नाही इतकं धुकं. याला कंटाळुन एकजण जीव सोडतो. त्यचा म्रुतदेहाच काय करणार ती लोकं तसाच दुसरा दिवस काढतात. तिसर्या दिवस म्हणजे आज कसातरी संपर्क झालाय त्यांना. सर्वांना खाली आणलं गेलय. एकाचा जिव गेलेला ...