गंगापुत्र देवव्रत ( भीष्म पितामह ) द्वापारयुगात हस्तिनापूरवर राजा शंतनू यांचा शासन होता. त्यांच्या पत्नीचे नाव गंगा होते. राणी गंगेला राजा शंतनूपासून पुत्रप्राप्ती झाली. " देवव्रत " - असे त्याचे नामकरण करण्यात आले. देवव्रताच्या जन्मानंतर दिलेल्या वचनाचे पालन करत राणी गंगा राजा शंतनू यांना सोडून निघून गेली. भीष्म प्रतिज्ञा एक दिवस गंगेत नौका विहार करत असताना राजा शंतनू यांची भेट सत्यवतीशी होते. ते तिच्या रुपावर इतके भाळतात की, सत्यवतीच्या वडिलांसमोर विवाह प्रस्ताव ठेवतात. मात्र, सत्यवतीपासून होणारा पुत्र हस्तिनापूरचा सम्राट होईल, अशी अट ते राजा शंतनू समोर ठेवतात. राजा शंतनू ही अट मान्य करत नाहीत. देवव्रताला जेव्हा ही गोष्ट समजते, तेव्हा तो आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा करतो. त्यानंतर राजा शंतनू आणि सत्यवती यांचा विवाह होतो. इच्छा मृत्यूचे वरदान देवव्रताने घेतलेल्या संकल्पामुळे राजा शंतनू अतिशय प्रभावित होतो आणि देवव्रताला इच्छा मरणाचे वरदान देतो. देवव्रताच्या या प्रतिज्ञेमुळे त्याला पुढे भीष्म म्हणून ओळख मिळते. महाभारतात भीष्म म...