सरदार पिलाजी जाधवराव पिलाजी जाधवराव यांच्या वडिलांचे नाव चांगोजी तर आईचे नाव हंसाई होते. चांगोजी यांच्या कडे वाघोलीच्या पाटीलकीचे वतन चालत आले होते. पिलाजी, बाजीराव व चिमाजी आप्पा यांचे युध्दशास्त्रातील गुरु होते. शाहू महाराजांच्या काळात मराठे उत्तर हिंदुस्थानात खूप सक्रिय होते. तेथे जवळजवळ प्रत्येक वर्षी स्वारी करून मुलूख आणि खंडणी प्राप्त करून घेत असत. पिलाजी जाधवराव हे या हालचालीं मधील एक अग्रणी सरदार होते. त्यांनी अनेक स्वार्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली. पिलाजींना सागर प्रांती चार खेड्यासह ( बध परडीया , खुजनेरखेडा , हथना ) मोकलमाऊ , चौका , खामखेडा , खमरीया , गढामंडळ वगैरे मुलुख छत्रसाल राजाने जहागिर दिला. पिलाजींनी भदावर , माळवा , कमरगा , नरवरा शिप्री , ग्वाल्हेर , भोपाळ , सिरोंज , दतिया , ओछा , दिल्ली स्वारी , इत्यादी लढायांत भाग घेतला होता. त्यांनी उत्तरेकडील रतनगडचा पण किल्ला जिंकून घेतला होता. पिलाजी जाधवरा वांनी सासवड, दिवा, वाघोली, जाधववाडी या व्यापारी पेठा वसवल्या होत्या. त्या संबंधी शाहूमहाराज एका पत्रात म्हणतात : ‘राज्याभिषेक शके ३४ सर्वधारी ...