पुण्याला लाभले - एक थोर मूर्तीकार !! कै. श्री. नागेश शिल्पी (१९३५-२०१०) तसे पहायला गेलं तर खूप मूर्तीकार आहेत, पण त्यातील एक म्हणजे जगप्रसिद्ध मूर्तिकार कैलासवासी श्री. नागलिंग शंकराप्पा आचार्य शिल्पी पंडित उर्फ कैलासवासी श्री. नागेश शिल्पी (१९३५-२०१०) . पुण्यातील गणपती आणि मूर्तीकार कैलासवासी श्री.नागेश शिल्पी यांचे एक नाते आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी घडवलेल्या पैकी ८ मूर्त्या या पुण्यात विराजमान आहेत. यांनी साकारलेली सर्वांगसुंदर अद्वितीय गणेश मंडळांच्या मूर्ती मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (तिसरी मूर्ती) , जिलब्या मारुती गणपती, निंबाळकर तालीम मंडळ, गजानन मंडळ, गरुड गणपती मंडळ, माती गणपती, जगोबादादा तालीम मंडळ, मार्केटयार्ड शारदा गणेश मंडळाची. ह्या ८ मूर्त्या पुण्यात विविध ठिकाणी विराजीत आहेत. तसेच त्वस्टा कासार समाज पुणे, श्री गणेश तरुण मंडळ गणपती चौक तळेगाव दाभाडे, अमर मित्र मंडळ सासवड, जय गणेश मंडळ कराड, गजानन मित्र मंडळ महाड, अशा मिळून पुण्यात १३ गणपतीच्या मुर्त्या कै.श्री.नागेश शिल्पी यांनी घडवल्या. त्या स...