Skip to main content

Posts

Showing posts with the label गणपती

संकष्टी चतुर्थी / Sankasti Chaturthi

संकष्टी चतुर्थी संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यांत दुसर्‍या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी " संकष्टी चतुर्थी " असते. हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. अशी या व्रताची थोड्क्यांत पाळ्णूक आहे. " श्रीसंकष्टहरगणपती " हे या व्रताच्या देवतेचे नांव आहे, हे व्रत करणार्‍या स्त्री अगर पुरुषाने, व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी. सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचे उद्यापन करावे. काहीजण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेकजण सततच संकष्टीचा उपवास करतात. एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हासला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की " आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल ! " शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण ...

लाडक्या गणपती बाप्पाला मोदक का आवडतो ?

लाडक्या गणपती बाप्पाला मोदक का आवडतो ? असं म्हणतात की हृदयाचा मार्ग उदराच्या रस्त्याने जातो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीचं मन असो किंवा आपल्या आराध्य दैवताचं ! देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं‌ रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक" नेमका कधीपासून अस्तित्वात आला, कसा प्रचलित झाला हे जाणून घेणंही तितकंच रोचक आहे. मोदकाच्या उत्पत्तीचे संदर्भ दोन काळात विभागावे लागतात. एक पुराण काळातला आणि दुसरा अलिकडच्या काळातला संदर्भ‌. दोन पुराण कथांमध्ये मोदकाचा उल्लेख आहे. त्यापैकी एक पद्मपुराणातली कथा असं सांगतं की, एकदा देवीदेवता अमृतापासून सिद्ध केलेला दिव्य मोदक देवी पार्वतीसाठी घेऊन आले. देवी पार्वतीचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश दोघंही त्या मोदकास भुलले. दोघांनीही तो मोदक आपणास हवा असा हट्ट धरला. त्यावर देवी पार्वतीनं असा उपाय शोधला की जो धर्माचरणात श्रेष्ठ असेल त्याला या मोदकाची प्राप्ती होईल. त्यावर आपण ज...

गणपतीला दुर्वा का आवडतो ?

गणपतीला दुर्वा का आवडतो ? अनलासुर नावाचा एक राक्षस होता. तो सर्व त्रैलोक्यालाच अतिशय त्रास देत असे. देवांना तर फारच छळीत असे. सर्व देव हैराण झाले आणि गणपतीला शरण गेले. गणपती हा महाकाय! वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असे त्याचे वर्णन आपण करतोच. अशा महाकाय गणपतीने त्या अनलासुरला चक्क गिळूनच टाकले. पण अनल म्हणजे अग्नी. हा असुर एक प्रकारे अग्नीचेच रूप होता. त्याला गिळून टाकल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली आणि त्याचा गणपतीला खूप त्रास होऊ लागला. आपल्याला संकटमुक्त करण्यासाठी गणपतीने अनलासुराला गिळून टाकले आणि तो स्वतःच त्रासात सापडला, हे समजल्यानंतर देव, ऋषी, मुनी या सर्वाना त्यांना जमतील ते उपचार सुरु केले. कुठूनतरी गणपतीच्या अंगाचा दाह शांत व्हावा आणि त्याला थंड वाटावे म्हणून अनेक औषधी वनस्पतीचा उपयोग करणे सुरु झाले. वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याचा अंगावर करण्यास प्रारंभ केला. नीलकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाग काढून त्याचा गळ्यात घातला. इंद्राने चंद्र त्याचा मस्तकावर ठेवला. परंतु कशाचाही उपयोग होईना. ब्रम्हदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन्ही कन्या त्य...