Skip to main content

Posts

Showing posts with the label पुणे

Pune Ganesh Utsav 2024

पुणे गणेशोत्सव 2024 पुण्यातील काही प्रसिद्ध देखावे ✨✨✨ List Format : Mandal Name - देखावे 1. Kasba Ganapati Mandal - Siddhatek Astavinayak Ganapati  2. Shreemant Dagluseth Halawai Ganpati Mandal - Jatoli Shiv Mandir, Himachal Pradesh  3. Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Mandal - Varad Vighneshwar Wada, Ozar 4. Tulshibaug Ganapati - Jagannath Puri Mandir, Odisha  5. Shree Gajanan Mitra Mandal, Tulshibaug - Shree Mahakaleshwar Mandir, Ujjain  6. Hutatma Babu Genu Mandal - Meenakshi Mandir, Madurai 7. Sharda Ganapati Mandal Trust - Kalpanik Shiv Mandir 8. Chhatrapati Rajaram Mitra Mandal - Durgiana Mandir, Amritsar Punjab 9. Shanipar Mandal Trust - Vrindavan Nagari 10. Panchamukhi Hanuman Tarun Mandal, Shukrawar Peth - Pashupatinath Mandir, Nepal 11. Nav Jawan Mitra Mandal, Sadashiv Peth - Shiv Parvati Vivah Celebrations 12. Trishund Ganapati Mandir Mandal - Kashi Vishwanath Mandir, Varanasi 13. Navnath (Achanak) Tarun Mandal Trust - 12 Jyotirlinga Darsha...

चाफेकर बंधू / Chaphekar Brothers

चाफेकर बंधू प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. दामोदरपंत, बाळकृष्ण आणि वासुदेव अशी त्यांची नावे. त्यांच्या वडिलांचे नाव हरिपंत चाफेकर. ते कीर्तनकार होते. दामोदरपंत हे जेष्ठ पुत्र. त्यांचा जन्म २५ जून १८६९ रोजी कोकणात झाला. बाळकृष्ण व वासुदेव हे दामोदरपंतांचे कनिष्ठ बंधू. कालांतराने हरिपंत पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. दामोदरपंत व त्यांचे बंधू वडिलांना कीर्तनात साथ देत. दामोदरपंतांनी अनेक तरुण संघटित करून ‘आर्यधर्म प्रतिबंध निवारक मंडळी’ ही गुप्त संघटना स्थापन केली. त्यांना व्यायामाचा, भाले, तलवारी चालविण्याचा छंद होता. ती शस्त्रेही त्यांनी जमविली होती. त्यांचे बंधू व अन्य काही तरुणही या छंदास लागले. पुढे त्यांनी पिस्तुले मिळवून नेमबाजी करण्यात प्रावीण्य मिळविले. इंग्रज सरकारविषयी त्यांच्या मनात भयंकर असंतोष होता. दामोदर चाफेकर यांनी १६ ऑक्टोबर १८९६ रोजी मुंबईतील व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यावर डांबर ओतले व त्या पुतळ्याच्या गळ्यात फाटक्या जोड्यांची माळ घातली. पण मुंबईच्या पोलिसांना हे कृत्य करणाऱ्याचा तपास लागला नाही. त्यांना इंग्रजी भाषेचा तिरस्कार होता. त्यामुळेच ते ‘इंग्रजी भाषा ही व...

रहाळकर श्रीराम मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) / Rahalkar Shreeram Mandir, Sadashiv Peth ( Pune )

रहाळकर श्रीराम मंदिर सदाशिव पेठ, पुणे नागनाथपारावरून शनिपाराकडे जाताना डाव्या हाताला श्रीरामतीर्थ या इमारतीमध्ये एक श्रीराम मंदिर आहे. तेच रहाळकर यांचे पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर. या मंदिराच्या नावाची पाटी वेलींनी झाकली गेल्यामुळे हे मंदिर लवकर लक्षात येत नाही. हे मंदिर सुमारे १८३ वर्ष जुने आहे. या मंदिरात श्रीरामाची सिंहासनाधिष्टीत पंचायतन मूर्ती बघावयास मिळते. श्रीराम कार्याचा व स्थळांचा ऐतिहासिक अभ्यास केलेले कै. श्री अमरेंद्र गाडगीळ यांनी ही मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असल्याचे सांगितले. प्राचीन ग्रंथांमध्ये रामरायाच्या अभिषेकाचे जे वर्णन आहे तशी हि मूर्ती आहे, म्हणून त्याला पट्टाभिषिक्त श्रीरामपंचायतन म्हटले जाते. सिंहासनावर बसलेले श्रीराम-सीता डावीकडे शत्रुघ्न व उजवीकडे लक्ष्मण व भरत आहेत. तसेच भालदार- चोपदार, नल-नील, जाम्बूवान, सुग्रीवादी आहेत. एकाच संगमरवरी दगडात हे सर्व कोरुन शिल्पकाराने ही किमया केली आहे. या मंदिरातील रामपंचायतन मूर्ती काही कारणामुळे काकिर्डे सराफांकडे गहाण म्हणून ठेवली होती. ती विकण्याचा मानस त्यांनी प्रकट करताच, श्री गणेशराम बाबा रहाळकर रा...

श्री भाजीराम मंदिर, नारायण पेठ ( पुणे ) / Shree Bhajiram Mandir ( Pune )

श्री भाजीराम मंदिर नारायण पेठ - पुणे केळकर रोडवर असलेल्या केसरी वाड्यावरून अलका चौकाकडे जाताना नारायण पेठ पोलीस चौकीच्या समोर एक १००/१५० वर्षापूर्वीचे राम मंदिर लागते. श्री भाजीराम मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे. हे पेशवेकालीन मंदिर अंदाजे इ.स. १७६१ / ६२ च्या दरम्यान बांधले गेले आहे. हे मंदिर तुळशीबाग राम मंदिराच्या समकालीन आहे. पूर्वी या ठिकाणी भाजी विकायला विक्रेते बसत असत, म्हणून त्या ठिकाणी असलेल्या मंदिराला भाजीराम मंदिर असे नाव पडले. पेशवेकालीन दफ्तरात या मंदिराचा उल्लेख आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून, पूर्वी या मंदिराचा गाभारा दगडी होता. सध्या बांधलेलं मंदिर हे नवीन आहे. मंदिरामध्ये लाकडी नक्षीदार देव्हाऱ्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्ती दगडी चौथऱ्यावर उभ्या आहेत. मूर्तीच्या मागे छोटी नक्षीदार प्रभावळ आहे. श्री रामाच्या मूर्तीवर छोटेसे छत्र लटकवलेले आहे. त्या मूर्ती अंदाजे दोन ते अडीच फुटांच्या आहेत. मूर्तीच्या एका बाजूला शेंदुरचर्चीत गणपतीची लहान मूर्ती तर दुसऱ्या बाजूला संगमरवरी हनुमानाची छोटी मूर्ती आणि काळ्या पाषाणातली महादेवाची पिंड आणि नंद...

जिलब्या मारुती, शुक्रवार पेठ - पुणे / Jilbya Maruti, Shukrawar Peth - Pune

जिलब्या मारुती शुक्रवार पेठ, पुणे शनिपारकडून मंडईकडे आपण जायला लागलो की वाटेत दिसते हे मारुती मंदिर. या भागात एक हलवायाचे दुकान होते. तो हलवाई नेहमी जिलब्यांचा हार मारुतीला अर्पण करायचा. त्यावरून येथील मारुतीला जिलब्या असे म्हणतात. गणेशोत्सवात आजही जिलब्यांचा नैवैद्य येथील गणपतीला दाखविला जातो. माहिती : ▪︎ नावामागे दडलंय काय ? ( सुप्रसाद पुराणिक ) Instagram : ▪︎ @punesehai ▪︎ @travelwala.chora

श्री भेकराई माता मंदिर, भेकराईनगर, हडपसर - पुणे / Shree Bhekrai Mata Mandir, Bhekrai Nagar, Hadapsar - Pune

श्री भेकराई माता मंदिर भेकराईनगर, हडपसर - पुणे येडाई, गांजाई, मळाई, फिरंगाई अशी देवीची नावे आपण सतत ऐकत असतो. पण ही नावे अशी का पडली किवा का प्रचलित झाली हे आपल्याला माहित नसते. अशाच प्रकारचे अजून एक नाव म्हणजे भेकराई. वाघजाई ह्या नावामध्ये "वाघ" शब्द येतो; म्हणून पडल्याचे आपण ऐकतो; तसेच भेकराई हे भेकर म्हणजे हरिण यावरून पडले असावे काय? भेकर हे सारंग कुळातील हरिण होय. हडपसरकडून सासवडकडे जाताना उजव्या बाजूस आधी तुकाई मातेचे मंदिर लागते. तेथून सासवडकडे जाऊ लागले, की बस डेपोच्या जवळच भेकराई देवीचे मंदिर आहे. हा परिसर भेकराईनगर म्हणूनच ओळखला जातो. ज्या टेकडीवर तुकाइचे मंदिर आहे, त्याच टेकडीवर भेकराईचेही मंदिर आहे. तुकाईच्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात, तर भेकराईचे मंदिर तेवढ्या उंचीवर नसल्याने मंदिरापर्यंत थेट गाडीने जातात येते. हे मंदिर प्रशस्त आहे. येथे देवीची दोन हातांची दोन ते अडीच फूट उंच मूर्ती आहे. देवी उभी असून, उजव्या हाताखाली मानवाकृती आहे; परंतु मूर्तीचे स्वरूप व ती मानवाकृती कोणाची हे स्पष्ट होत नाही. देवीची मूर्ती शेंदूरलिप्त आहे. देवीच्या ड...

श्री कृष्ण मंदिर, निगडी - पिंपरी-चिंचवड / Shree Krishna Temple, Nigdi, Pimpri-Chinchwad

श्री कृष्ण मंदिर, निगडी पिंपरी-चिंचवड - पुणे पिंपरी-चिंचवड परिसरात निगडी येथे श्रीकृष्णाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या भव्य मंदिराचे बांधकाम दाक्षिणात्य शैलीत केलेले आहे. या मंदिरात १९८७ मध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९९३ मध्ये येथे भव्य मंदिर बांधण्यात आले. येथे भव्य ध्वजस्तंभ बांधलेला आहे. या मंदिराच्या आवारात नवग्रह, गणपती, अय्याप्पा, हनुमान, वैष्णवदेवी, सुब्रमण्यम, नागदेवता ही मंदिरे आहेत. सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांकरिता येथे मोठा सुसज्ज हॉल बांधण्यात आलेला आहे. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येथे दहा पूजांचे आयोजन केले जाते. या मंदिराचा प्रसन्न परिसर भाविकांना मोहून टाकतो. या मंदिरातील दर्शनाची वेळ पहाटे ५ ते सकाळी ११.३० पर्यंत व संध्याकाळी ५ ते रात्री ८.४५ पर्यंत आहे. माहिती स्त्रोत : ▪︎ सफर ऐतिहासिक पुण्याची ( संभाजी भोसले ) Instagram : ▪︎ @punesehai ▪︎ @travelwala.chora 

श्री पुण्येश्वर मंडळ, कसबा पेठ - पुणे / Shree Punyeshwar Mandal, Kasba Peth - Pune

श्री पुण्येश्वर मंडळ कसबा पेठ, पुणे  कसबा पेठेत कुंभार वेशीजवळ पुण्येश्वर मंडळ आहे. त्या मंडळाच्या मूर्तीची खासियत म्हणजे ही मूर्ती हनुमानाच्या रूपात आहे. कारण येथे एक मारुतीचे मंदिर आहे. मारुती आपल्या हृदयात राम व सीता आहे हे दाखवत असलेली डाव्या सोंडेची, चतुर्भुज आणि उभी गणेशमूर्ती येथे आहे. खेडकर यांनी बनविलेली ही मूर्ती ३५ वर्षे जुनी आहे. सन्दर्भ : ▪︎ पुण्याचे सुखकर्ता ( स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक ) Instagram : ▪︎ @punesehai ▪︎ @travelwala.chora

सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर, बुधवार पेठ - पुणे / Shrimati Lakshmibai Dagduseth Halwai Shree Datta Temple, Budhwar Peth - Pune

सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर बुधवार पेठ, पुणे भक्तजनांचं केवळ गुरुवारीच नव्हे, तर दररोज गर्दी खेचणारं दत्तमंदिर म्हणजे बुधवार पेठेतील सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर (संस्थान). त्याचं ऐश्वर्य काय वर्णावं ! हे दुमजली मंदिर अंतर्बाह्य सुंदर, श्रीमंत, किंबहुना देखणं आहे. रंगीबेरंगी सुगंधित फुलांनी सजवलेल्या तिथल्या नयनमनोहर दत्तमूर्तीपुढून हलू नये, असं भाविकांना वाटल्यास नवल नाही. कै. दगडूशेठ हलवाई आणि कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई हे सात्त्विक व धार्मिक प्रवृत्तीचे जोडपे होते. उत्तरप्रदेशातून ते पुण्यात येऊन स्थायिक झाले. पुण्यात ब्रिटिश काळात जी मोठी प्लेगची साथ आली होती, तेव्हा साथीमध्ये अनेक माणसे मृत्युमुखी पडली. दगडूशेठ हलवाईंच्या घरातीलही काही लोक दगावले. तेव्हा प्लेगने मृत्युमुखी पडलेल्यांना ब्रिटिश सरकारने नुकसानभरपाई दिली होती. श्रीमती लक्ष्मीबाईंनाही काही रक्कम मिळाली. ही रक्कम स्वतःसाठी न वापरता त्याचा विनियोग चांगला व्हावा यासाठी त्यांनी त्यांचे गुरू माधवनाथ महाराज (इंदूर) यांना सल्ला विचारला. महाराजांनी श्री गुरुदेव दत्...

असे पडले वृत्तपत्राचे नाव "सकाळ"

असे पडले वृत्तपत्राचे नाव "सकाळ" सकाळ हे भारतातील पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी पुण्यात १ जानेवारी, १९३२ रोजी सुरू केले. दैनिक सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक आहे. या दैनिकाचे नाव सकाळ कसे पडले याची कहाणी रंजक आहे. नानासाहेब परुळेकर यांनी या वृत्तपत्राचे नाव काय असावे किंवा हे वृत्तपत्र लोकांपर्यंत कसे पोहोचेल, नवीन वृत्तपत्राची लोकांमध्ये उत्सुकता कशी निर्माण होईल याबाबत एक युक्ती लढविली. त्यांनी २० ऑक्टोबर, १९३१ रोजी केसरी, ज्ञानप्रकाश व काळ या वृत्तपत्रांमध्ये नव्या वृत्तपत्रासाठी नाव सुचवा ही जाहिरात प्रसिद्ध केली. दैनिकाला वाचकांनी नाव सुचवावे अशी स्पर्धा जाहीर करून त्यासाठी पहिल्या क्रमांकाला १५० रुपयांचे बक्षीस ठेवले तर दुसऱ्या क्रमांकालाही त्यांनी ५० रुपये बक्षीस जाहीर केले. सकाळच्या रौप्यमहोत्सवी अंकात स्वावलंबनाची कथा या लेखात परुळेकरांनी याविषयी लिहिले आहे, 'अमेरिकेतून शिकून आलेला हा गृहस्थ याला आपल्या पत्राचे नाव सुचत नाही मग हा लिहिणार काय? आणि पत्र चालविणार कस...

Temples In Hadapsar ( Pune )

Temples In Hadapsar, Pune 1. Shree Chandramauleshwar Mandir, Magarpatta Chowk 2. Shree Mahalakshmi Mandir, Malwadi Road 3. Shree Vitthal Rakhumai Mandir, Hadapsar Gaon 4. Shree Hanuman Mandir, Hadapsar Gaon 5. Shree Ram Mandir, Hadapsar Gaon 6. Shree Kaal Bhairavnath - Mata Jogeshwari Mandir, Hadapsar Gaon 7. Shree Rudreshwar Mahadev Mandir, Tupe Corner, Amanora - Hadapsar 8. Ramtekadi Mandir Group, Ramtekadi 9. Shree Mahalakshmi Mandir, Magarpatta - Hadapsar Instagram - @TRAVELWALA.CHORA

बटाट्या मारुती मंदिर, शनिवार पेठ - पुणे / Batatya Maruti Mandir, Shaniwar Peth - Pune

बटाट्या मारुती मंदिर, शनिवार पेठ - पुणे सुमारे १०००/१२०० वर्षापूर्वी सध्या जिथे पुणे वसलेले आहे तिथे एक लहानशी वाडी होती. त्यात मारुती, बहिरोबा (रोकडोबा), पुण्येश्वर आणि नारायणेश्वर अशी देवळे होती. त्या मारुतीला एक छोटी घुमटी होती. कालौघात पुण्याचा विस्तार वाढला. पुण्याची वस्ती वाढू लागली. पेशव्यांनी शनिवार वाडा बांधला. ती मारुतीची छोटी घुमटी शनिवारवाड्यासमोर आली. ती कसबा पेठेची पश्चिमेची आणि शनिवार पेठेची पूर्वेची हद्द समजली जायची. शनिवार वाडा ते या घुमटीपर्यंतची जागा मोकळी होती. मंडई बांधण्यापूर्वी शनिवार वाड्यासमोरच्या पटांगणात भाजी बाजार भरत असे. त्या बाजारात असलेल्या मारुती मंदिराजवळ बटाटे विकणारे बसत असत. म्हणून या मारुतीला बटाट्या मारुती असे नाव पडले. पण त्या नावाला कागदोपत्री काही पुरावा नाही. तसेच त्या मारुतीचे जुने नावही सापडत नाही. सध्या असलेले मंदिर शिवाजी पुलाचे बांधकाम ज्यांनी केले त्या रावबहाद्दूर गणपत महादेव केंजळे यांनी केले. या मारुतीचे वैशिष्ट्य असे की तो बसलेला आहे. अशी मारुती मूर्ती दुर्मिळ असते. मारुतीच्या एका हातात गदा आहे तर दुसरा हात गुढघ्यावर ठेवले...

श्री पार्वतीनंदन गणपती ( खिंडीतला गणपती ), चतुःश्रुंगी - पुणे / Shree Parvati Nandan Ganpati ( Khinditala Ganapti ), Chattushringi - Pune

श्री पार्वतीनंदन गणपती ( खिंडीतला गणपती ),  चतुःश्रुंगी  - पुणे गणेशखिंडीत ' पार्वतीनंदन गणपती ' किंवा ' खिंडीतला गणपती ' हे एक प्राचीन देवस्थान आहे. गणपती खिंडीत असल्याने कदाचित त्याला खिंडीतील गणपती असे नाव पडले असावे. सेनापती बापट रस्ता विद्यापीठ रस्त्याला ( गणेशखिंड रस्ता ) जेथे मिळतो तेथे हे मंदिर आहे. मंदिरास दगडी गाभारा, दगडी मंडप व लाकडी सभामंडप आहे. मंदिरात दीपमाळा देखील आहेत. मंदिराचा कळस वैशिष्ट्यपूर्ण असून त्यात २०-२५ माणसे मावतील एवढी जागा आहे. शेंदूरचर्चित डाव्या सोंडेची चतुर्भुज मोठी गणेशमूर्ती येथे आहे. सुमारे ४०० वर्षांपासून गणपती अस्तित्वात होता असे म्हटले जाते. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. मातोश्री जिजाबाई पाषाणला असलेल्या सोमेश्वर मंदिरात जात असताना इथे विसावल्या होत्या. तेव्हा येथील एका ठकार नावाच्या ब्राह्मणास दृष्टांत झाला की कसब्यात मी ओढ्याच्या काठी शमी वृक्षाखाली आहे. उत्खनन करून तेथे गजाननाचा स्वयंभू तांदळा मिळाला. राजमाता जिजाऊ यांनी तेथे मंदिर बांधले. ते मंदिर म्हणजेच ग्रामदेव कसबा गणपती मंदिर. या मं...

श्री केसरीवाडा गणपती, नारायण पेठ - पुणे / Shree Kesariwada Ganpati, Narayan Peth - Pune

श्री केसरीवाडा गणपती, नारायण पेठ - पुणे ( मनाचा पाचवा गणपती ) इ.स. १८९४ साली स्थापन झालेल्या केसरीवाडा गणपतीस थेट लोकमान्य टिळकांचा वारसा लाभला आहे. १९०५ साली नारायण पेठेतील श्रीमंत सरदार गायकवाड वाड्यात म्हणजेच नंतरच्या केसरी वाड्यात ( टिळक वाड्यात ) हा उत्सव साजरा होऊ लागला. तत्पूर्वी तो सदाशिव पेठेतील विंचूरकर वाड्यात साजरा होत असे. हा गणपती आधी गायकवाड वाड्याचा गणपती म्हणून ओळखला जात असे. मंडळाने शतकोत्तर रौप्यमहोत्सव ( १२५ वर्षे ) साजरा केला आहे. उत्सवी गणपतीची मूर्ती अत्यंत सुबक, रेखीव आणि सुंदर असते. गेली अनेक दशके मूर्तीच्या स्वरूपात बदल झालेला नाही. शनिवार पेठेतले मूर्तिकार गोखले हे श्रींची मूर्ती साकारतात. उत्सवमूर्तीच्या मागे एक थोडी मोठी अलीकडील सहा हातांची चांदीची मूर्ती करण्यात आली. हा श्री गणेश महावैष्णव ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील वर्णनानुसार साकारलेली आहे. त्यामागे लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा बघायला मिळतो. केसरी वाड्यात केसरी वृत्तपत्राचे कार्यालय आहे. गणेशोत्सवादरम्यान अनेक दिग्गजांची येथे व्याख्याने झाली आहेत. लोकमान्य टिळकांनी एकदा 'द...

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, सारसबाग - पुणे / Shree Siddhivinayak Ganpati Mandir, Sarasbaug - Pune

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, सारसबाग - पुणे पुणे शहर, पेशवे, आणि श्रीगणेश यांचे एकमेकांशी खूप जवळचे नाते आहे. नानासाहेब पेशवे म्हणजे पुणे शहराचे शिल्पकार. त्यांनी वाढत्या पुणे शहराची नियोजनबद्ध वाढ व्हावी, अडचणी दूर व्हाव्यात म्हणून भरपूर मेहनत घेतली. त्यांनी इ.स. १७५५ ला पर्वतीच्या पायथ्याला आंबील ओढ्यावर दगडी धरण बांधून २५ एकर क्षेत्राचे मोठे तळे बांधले आणि आंबील ओढ्याचा प्रवाह बदलला. १७ महिने या तळ्याचे बांधकाम चालू होते. त्यावेळेस तळे बांधकामास ४,९९, ५५३ रुपये इतका खर्च आला होता. 'पर्वतीचे तळे' म्हणून हे तळे प्रसिद्ध होते. तळ्याच्या भोवती हिराबाग, लोटणबाग सारख्या बागा निर्माण केल्या गेल्या. या नयनरम्य परिसरातील तळ्यात पेशवे नौकाविहार करण्यासाठी येत. अशीच एक तळ्यात छोटे बेट राखून तिथे त्यांनी एक बाग बांधली. बेटावर निरनिराळ्या प्रकारची झाडे लावून निसर्गशोभा वाढविण्यात आली. बागेचे नाव सारस नावाच्या पक्ष्यावरून 'सारसबाग' ठेवले गेले. थोरले बाजीराव पुत्र नानासाहेब पेशवे (पेशवेपदावरील कारकीर्द - १७४० ते १७६१) यांनी राखलेल्या सारसबागेच्या बेटावर पुढे त्यांच्या...

श्री बिर्ला गणपती मंदिर, सोमाटणे फाटा - पुणे / Shree Birla Ganpati Temple, Somatane Phata - Pune

श्री बिर्ला गणपती मंदिर, सोमाटणे फाटा - पुणे पुण्यावरून मुंबईला जाताना सोमाटणे फाट्याजवळ डावीकडे आपल्याला एका टेकडीवर असलेल्या गणपतीच्या भव्य मूर्तीचे दर्शन घडते. हे आहे बिर्ला गणपती मंदिर. पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटयावरून सुमारे ४ किलोमीटरवर शिरगाव येथे साईबाबांचे मंदिर आहे. मंदिराच्या रस्त्याला जाताना प्रथमच डाव्या हाताला एका छोटयाश्या डोंगरावर गणपतीची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते. बिर्ला उद्योग समूहाच्या वतीने ७२ फूट उंचीची श्री गणोशाची मूर्ती उभारण्यात आली आहे. ही मूर्ती राजस्थानचे कारागीर मातुराम वर्मा व नरेश वर्मा यांनी घडवली आहे. जानेवारी २००९ मध्ये चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख स्वामी तेजोमयानंदजी यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सिमेंट काँक्रिटमध्ये ही मूर्ती उभारली आहे. मूर्तीवर तांब्याचा मुलामा आहे. या मूर्तीची निर्मिती १६ एकर जागेत झाली आहे. एकूण १७९ पाय: या येथे जाण्यास लागतात. मूर्तीचे वजन १००० टन आहे. मूर्ती शेजारी मूषकराज हातात मोठा लाडूचा प्रसाद घेऊन उभे आहेत. संध्याकाळी या ठिकाणी लाईट्स सोडल्याने मूर्ती आणखीच सुं...

श्री कसबा गणपती मंदिर, कसबा पेठ - पुणे / Shree Kasba Ganpati, Kasba Peth - Pune

श्री कसबा गणपती मंदिर, कसबा पेठ - पुणे पुण्याच्या इतिहासात डोकावले तर पुण्याची मूळ वस्ती कसबा पेठेच्या भागात होती. 'कस्ब' या फारसी शब्दापासून कसबा शब्द आला असून त्याचा अर्थ होतो कारागिरी. कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदैवते. शुभकार्याची पहिली अक्षत ठेवण्याची येथे परंपरा आहे. अगदी 'लोकमान्य' बाळ गंगाधर टिळक यांच्याकडे झालेल्या मंगलकार्याची अक्षत येथे ठेवली गेली होती. कधीकाळी 'गोविंदाग्रज' म्हणजेच राम गणेश गडकरी यांनी नाटक लिहिल्यावर कसबा गणपतीसमोर ठेवून प्रार्थना केली होती. त्यांचा राहता वाडा येथून जवळच असलेल्या पिंपळाच्या पारासमोर होता. कसबा गणपतीबद्दल अनेक आख्यायिका सुद्धा रूढ आहेत. आज आपण या प्रसिद्ध गणपतीबद्दल जाणून घेऊयात. कसबा गणपती म्हटलं की राजमाता जिजाऊ व बालशिवबा यांचा मंदिराशी आलेला संबंध आपणास दिसतो. आदिलशाहीत पुणे शहाजीराजांकडे जहागिरी होती. जिजाऊ महाराज व शिवराय पुण्यात असताना मंदिर बांधले गेले. तेव्हा मंदिराजवळ असलेल्या लालमहालात शिवराय आणि राजमाता जिजाऊंचे वास्तव्य होते. आपल्याला इतिहासात एका अस्सल पत्रात उल्ले...

Shree Hanuman Temples In Pune / पुण्यातील हनुमान ( मारुती ) मंदिरे

Shree Hanuman ( Maruti ) Temples in Pune 1. Rokadoba Maruti, Shivajinagar ( Behind Congress House ) 2. Untade or Madrasi Maruti Mandir, Somwar Peth ( Near K.E.M Hospital ) 3. Ganjicha Maruti Mandir, Lakshmi Road ( Near Kabir Police Station ) 4. Akra Maruti Mandir, Shukrawar Peth ( Paranjape Wada ) 5. Gondavlekar Maharaj Math, Nene Ghat - Shaniwar Peth 6. Daas Maruti Along With Bali & Sugriva, Dhaikar Wada - Somwar Peth 7. Maruti Someshwar Mandir, Pashan 8. Tave Aali Maruti ( Inside Shree Ram Mandir ), Kapadganj - Ravivar Peth 9. Twins ( Jule ) Maruti Mandir, Sadashiv Peth 10. Batateya Maruti Mandir, Shaniwar Wad - Shaniwar Peth 11. Maruti Mandir, Guruwar Peth ( Near Mithganj Police Station ) 12. Panchmukhi Maruti Mandir, Chhatrapati Shivaji Maharaj Road - Swargate 13. Khanya Maruti Mandir, East Street 14. Umbaraya Maruti Mandir, Old Tapkir Galli - Budhwar Peth 15. Gavtya Maruti Mandir, Anand Ashram - Appa Balwant Chowk 16. Jilbya Maruti Mandir, Near Tulshibaug 17. Dudhy...

जिलब्या मारुती मंदिर, शुक्रवार पेठ ( पुणे ) / Jilbya Maruti Mandir, Shukrawar Peth ( Pune )

जिलब्या मारुती मंदिर, शुक्रवार पेठ - पुणे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट, "जिलब्या गणपती” हे सुप्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. आजच्या पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आताच्या मंडई शनिपार रोडवर सुमारे २५० ते ३०० वर्षापुर्वी आंबील ओढा वाहत होता. आंबील ओढ्याचा प्रवाह, भाऊ महाराज बोळाच्या पश्चिमेकडून जिलब्या मारुतीजवळून पुढे जोगेश्वरी देवळाजवळून शनिवारवाड्याच्या पश्चिमेने पुढे जात अमृतेश्वराच्या देवळापाशी नदीला मिळत असे. ह्याच ओढ्याकाठी मंडई शनिपार रोडवर पुर्वी एक स्मशान होते. तिथे एक मारुतीचे छोटस देऊळ होते ( जिलब्या मारुती मंदिर ). त्याला पुर्वी विसावा मारुती म्हणत. कारण लोक त्या ठिकाणी कायमचा विसावा घेत. पूर्वी पती निधनानंतर सती जाण्याची पद्धत होती. यामुळे स्वर्गारोहणाचे पुण्य लाभते, असे समज रूढ होता. अशा सती गेलेल्या स्त्रियांची वृंदावने आठवण म्हणून बांधत. ह्या मारुती मंदिराशेजारी सरदार शितोळे घराण्यातील एक स्त्री सती गेली होती, तिचे स्मारक आहे. पुढे पेशवाईत वस्ती वाढु लागल्यावर इ. स. १७३० च्या सुमारास नाना साहेब पेशवे यां...

धनुर्धारी श्रीराम मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) / Dhanurdhari Shree Ram Mandir, Sadashiv Peth ( Pune )

धनुर्धारी श्रीराम मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे आराध्यदैवत प्रभु रामचंद्र आहेत. रामचंद्राच्या कृपेनेच श्री. के. वि. लिमये यांनी दिलेल्या देणगीतून या मंदिराचा हेतू साध्य झाला व १९३४ मध्ये रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. मूर्ती धनुर्धारी, संगमरवरी आणि पश्चिमाभिमुख आहे. १५x१०x१५ फूट लांबी, रुंदी, उंचीचे मंदिर २६ फूट कळसासह बांधलेले आहे. त्या वेळी अंदाजे ३,२००/- रुपये खर्च आला. मंदिरासमोरील सभा मंडप ४४ x ३३ फूट लांबी-रुंदीचा असून, श्रीमती - राधाबाई कृष्णाजी भिडे यांनी आपले पति कृ.ना. भिडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या देणगीतून १९४१ मध्ये बांधण्यात आला. मंदिरास प्रदक्षिणामार्ग आहे. या मूर्ती रामरक्षेतील 'तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ' या १७ व्या श्लोकाच्या आधारे पांडुरंग चिमाजी पाथरकर यांनी करून दिल्या. त्या वेळी १,०००/- रुपये खर्च आला. विद्यार्थ्यांच्या पुढे अशी विद्यार्थिदशेतील मूर्ती पाहिजे म्हणून विश्वामित्र ऋषींबरोबर यज्ञरक्षणासाठी निघालेल्या धनुर्धारी राम-लक्ष्मणाची मूर्ती स्थापन केली. मूर्ती पश्चिमाभिमुख असून,...