Skip to main content

Posts

Showing posts with the label शिवाजीनगर

घोरपडे घाट, शिवाजीनगर - पुणे / Ghorpade Ghat, Shivajinagar - Pune

घोरपडे घाट, शिवाजीनगर - पुणे   छत्रपती शिवाजी पूल म्हणजे नव्या पुलावरून पूर्वेच्या बाजूला खाली नदीपात्रात डोकावून पाहिले, तर खणखणीत चिरेबंदी बांधकाम आणि त्यांच्या रेखीव पायऱ्या असे स्थापत्य ठळकपणे नजरेत भरते. अगदी नदीतील पाण्याच्या प्रवाहाजवळ हे बांधकाम नेमके कसलं ? तर याचं उत्तर आहे - ' घोरपडे घाट ' ! पेशव्यांचे सरदार यशवंतराव घोरपडे यांचे वंशज असणाऱ्या दौलतराव घोरपडे यांनी १८२१ मध्ये चार बुरुजांसह भक्कम संरक्षक भिंत, नगारखान्यासह प्रवेशद्वार, नदीच्या थेट प्रवाहापर्यंत जाणाऱ्या प्रशस्त पायऱ्या असा एक घाट बांधून घेतला. या दक्षिणाभिमुखी वास्तुरचनेच्या बुरुजांना जोडणाऱ्या भिंतीमध्ये दोन्ही बाजूंना दोन खोल्या आहेत. भिंतीवर देवड्या आहेत. इथून मुठेपर्यंत जाणाऱ्या सुबक प्रमाणशीर पायऱ्यांची रचना देखणी आहे. पानशेत प्रलयाच्या आपत्तीत या घाटाचे दगडी बांधकाम काही ठिकाणी कोसळले. तेथे एक शिलालेख होता. तोही स्थानभ्रष्ट झाला. ' श्री येशवंत चरणितत्पर दवलवराव व पिराजीराव घोरपडे, अमिरुळ उमरा व शंबेसी निरंतर, शके १७५३ विक्रमनाम स्मशेर ( संवत्सरे ) फाल्गुन शु पंचमी रमज्यान ' अस...