Skip to main content

Posts

Showing posts with the label Tukaram Maharaj Sansthan

संत तुकाराम महाराज संस्थान ,श्री क्षेत्र देहू / Saint Tukaram Maharaj Sansthan , Dehu

संत तुकाराम महाराज संस्थान , देहू  धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥ तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंग देवतेमुळे. हे जागृत स्थान आहे. इंद्रायणी नदीच्या शोभायमान तीरावर पांडुरंग देवाचे देवालय आहे. कटेवर कर ठेवून विश्वाचा जनिता उभा आहे. वामांगी माता रखुमाई आहे. समोर अश्वत्थ वृक्ष आहे. पारावर गरुड हात जोडून उभा आहे. द्वारात विघ्नराज आहेत. बाहेर भैरव आणि हनुमानजी आहेत. दक्षिणेला हरेश्वराचे देवालय आहे. जवळच बल्लाळाचे वन आहे. त्यात सिध्देश्वराचे अधिष्ठान आहे. क्षेत्रवासी धन्य होते, ते दैववान आहेत, वाचेने देवाचा नामघोष करीत आहेत. तुकाराम तुकोबांचे वेळचें हे देहू गावचे वर्णन आहे. तुकोबांपासून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी तुकोबांचे पूर्वज विश्वंभरबाबा हे देहू गावी राहात होते. या घराण्याचे कुलदैवत विठोबा होते. घराण्यात आषाढी-कार्तिकीची वारी विश्वंभरबाबाचे वाडवडिलांपासून चालत आली होती. पंढरीची वारी वाडवडिलाप्रमाणे नियमाने चालविण्यास बाबांच्या मातोश्रीने विश्वंभरबाबांच्या ...