Skip to main content

Posts

Showing posts with the label Pune Culture

Vishrambaug Wada , Pune / विश्रामबाग वाडा , पुणे

 विश्रामबाग वाड्याचा इतिहास , पुणे  श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांनी हा वाडा सन १८०७ रोजी बांधला. सदाशिव पेठेत ज्या ठिकाणी हा वाडा बांधला आहे त्या ठिकाणी पूर्वी हरीपंत फडके यांच्या मालकीची मोठी बाग होती. ती जागा सन १७९९ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने विकत घेतली आणि पुढे आपल्या निवासस्थानासाठीम्हणून वाडा बांधायला घेतला. या वाड्याच्या बांधकामास सन १८०३ मध्ये सुरुवात झाली व तो सन १८०९ मध्ये संपूर्ण बांधून झाला. या वाड्याच्या बांधकामासाठी २,००,५४० रुपये इतका खर्च आला. शिवाय हौद व मोरी बांधण्यास १४००० रुपये लागले. वाड्याच्या नैऋत्य दिशेस पुष्करणीचा  हौद बांधला त्यास ८५०० रुपये इतका खर्च आला. हा वाडा २६० फूट लांब व ९० फूट रुंद आहे. दुर्दैवाने या वाद्याचा उपभोग बाजीरावास फक्त ८ वर्षे घेता आला. वाड्याच्या पहाऱ्यासाठी जो बंदोबस्त ठेवला जात असे त्यासाठी मासिक खर्च हा ४०० रुपये इतका येत होता. इंग्रजांनी सन १८१८ मध्ये पुणे ताब्यात घेतल्यावर पुढे २ वर्षे या वाड्यास कुलूप होते.त्यांनतर सन १८२१ मध्ये इंग्रज सरकारकडून या वाड्यात संस्कृत कॉलेजची स्थापना करण्यात आली. या संस्...