Skip to main content

Posts

Showing posts with the label Shri Kandoba Temple

श्री खंडोबा मंदिर, सारसबाग ( पुणे ) / Shri Kandoba Temple, Sarasbaug ( Pune )

श्री खंडोबा मंदिर, सारसबाग ( जि. पुणे ) खंडोबा, महाराष्ट्र व कर्नाटक यांतील एक प्रसिद्ध लोकदैवत होय. मल्लारी ( मल्हारी ) मार्तंड, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, मैलार इ. नावांनीही खंडोबा प्रसिद्ध आहे. रा. चिं. ढेरे यांच्या मते हे दैवत सुमारे अकराव्या शतकापासून विशेष लोकप्रिय झाले. ब्राह्मणांपासून तो धनगर रामोश्यांपर्यंत खंडोबाचे उपासक आढळतात. तो अनेकांचे कुलदैवतही आहे. मणी आणि मल्ल ह्या दैत्यांच्या नाशासाठी शंकराने मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीस ( चंपाषष्ठी ), मार्तंडभैरवाचा अवतार धारण केला. अशी कथा " मल्लारि-माहात्म्यम्  " ह्या संस्कृत ग्रंथात आहे. प्रस्तुत ग्रंथ १२६० ते १५४० च्या दरम्यान रचिला असावा. या ग्रंथामुळेच खंडोबाला महाराष्ट्र–कर्नाटकांत विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. अश्वारूढ, उभ्या व बैठ्या अशा त्रिविध स्वरूपात खंडोबाच्या मूर्ती आढळतात. चतुर्भुज कपाळाला भंडार, हातांत डमरू, त्रिशूळ, खड्‌ग व पानपात्र, वाहन घोडा आणि म्हाळसा व बाणाई ह्या भार्या, असे त्याचे वर्णन आढळते. म्हाळसा आणि बाणाई ह्या जातीने अनुक्रमे वाणी आणि धनगर असल्याच्या लोककथा रूढ आहेत. खंडोबाच्या परिवारात...