Skip to main content

Posts

Showing posts with the label Maharashtra

श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) / Shri Lakshmi Narasimha Mandir, Sadashiv Peth ( Pune )

श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) महाराष्ट्रात लक्ष्मीनृसिंहाची मंदिरं तशी थोडीच आहेत. त्यापैकी एक मंदिर आपल्या पुण्यातील सदाशिव पेठेत आहे. खुन्या मुरलीधर मंदिराकडून टिळक रस्त्याकडे जाताना, सध्याच्या पुणे विद्यार्थी गृहाच्या समोर एक जुन्या पद्धतीचा दगडी पायऱ्यांचा लाकडी दरवाजा दिसतो. आतल्या बाजूस असलेल्या श्री लक्ष्मीनृसिंह मंदिराचे ते प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये पेशवेकालीन मराठा शैलीतील लक्ष्मीनृसिंहाचे लहानसे मंदिर आहे. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत १७८८ मध्ये येथील नृसिंह मंदिराचे बांधकाम करण्यात आले. १८ व्या शतकात बांधलेल्या तुळशीबाग व बेलबाग या मंदिरांच्या धर्तीवर या मंदिराची रचना केलेली आहे. हे मंदिर चिरेबंदी असून मंदिराला सुंदर कळस, कोरीव छत व महिरपी असलेला लाकडी दिवाणखाना आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून आत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस पिंपळाचा भव्य पार आहे. या पारावर पेशवेकालीन हनुमानाची मूर्ती, नागदेवतेच्या शिळा व दगडात कोरलेल्या अज्ञात पादुका आहेत. या पारानजीक असलेल्या खोलीत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे...

सुधागड / Sudhagad

सुधागडचे ऐतिहासिक महत्त्व सुधागड हा लोणावळा डोंगर रांगांमधील किल्ला रायगड जिल्ह्यातील पाली गावापासून फक्त १० किमीवर आहे. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर असून गड विस्ताराने फारच मोठा आहे. या प्राचीन गडाला भोरपगड असेही म्हणत असत. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणावळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची मूळ जडणघडण झाली असावी असा अंदाज असून या किल्ल्याने शिलाहार, यादव, बहमनी, मुघल अशा राजसत्ता पाहिल्या. व नंतर इ.स. १६४८ साली हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील झाला. शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले. नारो मुकुंद यांनी शिवरायांना सुधागडला हिंदवी स्वराज्याची राजधानी करावी असे सुचविले होते. मात्र महाराजांनी रायगडाची निवड करून सुधागडाच्या बांधकामासाठी पाच हजार होन देऊन किल्ला लढाऊ बनवला. त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता. महाराजांच्य...

खापरखवल्या / Shieldtail

खापरखवल्या ( Shieldtail ) अतिशय दुर्मिळ असा हा खापरखवल्या जातीचा साप आहे. हा बिन विषारी असून हा पावसाळ्यात जास्त आढळतो. सह्याद्रीत भटकंती करताना कधी ना कधी तुम्हाला ह्या प्रजातिचा दर्शन झालाच असणारे. ह्या सापला इंग्रजीत " Phipson's Shieldtail " अस म्हणतात. हा साप महाराष्ट्रात मुंबई, पुण्या जवळ डोंगर भागात तसेच सातारा, महाबळेश्वर आणि कर्नाटकच्या काही भागात आढळतो. या सापाचा फीप्संस, एलोथ, मोठ्या खवल्याचा खापरखवल्या, महाबळेश्वरी खापरखवल्या अशा चार उपजाती आहेत. हा साप जास्तीत जास्त १ ते २ फूट एवढा असतो. डोक्यावर केशरी रंगाचा किवा गडद पिवळ्या रंगाचा डाग असतो. मानवीय हस्तक्षेप, अमाप वृक्षतोड आणि निसर्गाच्या ऱ्हासामुळे सापांच्या अनेक प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. - संतोष पांडेय  Instagram : ©TRAVELWALA.CHORA

झांशीची राणी लक्ष्मीबाई / Queen Of Jhansi Rani Lakshmi Bai

झांशीची राणी लक्ष्मीबाई (१९ नोव्हेंबर १८३५–१८ जून १८५८) इंग्रजांविरुद्ध लढणारी १८५७ च्या उठावातील एक पराक्रमी स्त्री म्हणजे झाशीची राणी लक्ष्मी बाई होय. १९ व्या शतकातील वैधव्य प्राप्त झालेली स्त्री असूनही त्या सौदामिनीने आत्मविश्र्वासाने, स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह, स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य असा लढा दिला. आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटविला. झाशीच्या राणीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची आठवण ठेवूनच नेताजी सुभाषचंद्रांनी १९४३ च्या ऑक्टोबरमध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला ‘राणी झाशी रेजिमेंट’ असे नाव दिले. वेदकालीन पंचकन्यांइतक्याच श्रेष्ठ असणार्‍या या राणीच्या मृत्यूवर प्रत्यक्ष शत्रूनेही हळहळ व्यक्त केली. अवघ्या २८-२९ वर्षांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मोठ-मोठ्या संकटांचा सामना राणी लक्ष्मीबाईंना करावा लागला. परंतु कोणत्याही संकटापासून माघारी फिरणे त्यांना माहीत नव्हते. धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत...

मंदिरे कसे ओळखायचे ? / How To Identify Temples aand It's Architecture ?

मंदिरे कसे ओळखायचे ? महाराष्ट्र मधील मंदिराच्या बाबतीत बहुतांश लोक गल्लत करतात. सर्व मंदिरांना हेमाडपंथी असं संबोधित करून त्याचे कालखंड, त्याचा इतिहास सर्व काही गाळून टाकतो. यादव सम्राट रामचंद्रदेव याचा हेमाद्री हा सेनापती "सकलकरणाधिप" म्हटला जाई. १२ व्या ते १४ व्या शतकापर्यंत ह्यांचा सुवर्णकाळ.  त्याच्या काळाच्या अगोदरच्या शतकातील मंदिरे कशी बांधली असतील ? हा प्रश्न काही जनांना नक्कीच पडला पण याचे उत्तर मात्र कोणी शोधले नाही. त्याच्या अगोदर शिलाहार काळात ( ८ व्या ते १२ व्या), राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक यांच्या काळात उत्तम अशी घडीव मंदिरे बांधली गेली त्यांनाही लोक हेमाडपंथी म्हणून मोकळे होतात. त्या भागात कोणती सत्ता होती ? कोणत्या सत्तेची राजधानी किंवा त्याचा जवळ आहे का ? शिव आहे की वैष्णव ? मंग सत्ताधारी कोणते होते ? दानपत्र किंवा शिलालेख आहे का परिसरात ? हे सर्व लक्षात घेऊन कोणी अभ्यास करत नाही. दिसेल तिला हेमाडपंथी म्हणून मोकळे होतो. मुळात हेमाडपंथी ही मंदिराची शैली नाहीच. तिला आपण यादवकालीन म्हंटल पाहिजे. हेमाद्री हा कुशल सेनापती होता आणि मोठा धार्मिक ही हो...

गरुड शिल्प / Garuda Shilpa

गरुड शिल्प बऱ्याच वेळेला आपण किल्ल्यांवर फिरायला जातो तेव्हा अनेक प्रकारची शिल्पे पाहतो. काही प्रवेशद्वारांवर तर काही वाडयाच्या भिंतींवर, काही भिंतींवरील चित्रांवर तर काही नाण्यांवर ! त्यातून एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आढळून येते, ते म्हणजे ' गरुड शिल्प '. भारतवर्षात गरुडाला फार मोठे स्थान आहे. अनेक प्राचीन राज्ये आणि त्यांचे राजे गरुडाची पूजा करत असत. हिंदुस्थानात गरुडाच्या अनेक मूर्ती आढळून येतात. बघायला गेलं तर अनेक ठिकाणी गरुडाची मूर्ति अर्धमानवी आणि अर्धपक्षी स्वरूपात आढळतात. काही मूर्ती बसलेल्या अवस्थेत आहेत तर काही उभ्या. महाराष्ट्रात वैष्णव परंपरेत तयार केलेल्या गरुडाच्या मूर्ती या दोन हातांच्या असून त्या सदैव हात जोडलेल्या स्थितीत म्हणजेच ' अंजली ' मुद्रेत असतात. बरयाच वेळा काही काही गरुडमूर्तीना चार हातसुद्धा असतात, ज्याला ‘ वैनतेय ’ म्हणतात. काही गरुड मूर्ती एक गुडघा टेकवून बसलेल्या स्थितीत पण असतात, जिथे एका हातात सर्प तर दुसर्‍या हातात सस्त्र असते. ' गुरुमादाय उड्डीनः इति गरुड ' - म्हणजेच जड वस्तू उचलून उडणारा असा तो गरुड असे गरुडाचे वर्णन ...

अदालतवाडा ( अदालत राजवाडा ), सातारा / Adalatwada ( Adalat Rajwada ), Satara

अदालतवाडा ( अदालत राजवाडा ) छत्रपती संभाजीमहाराजांनंतर राजाराममहाराजांना जिंजीस जावे लागले व महाराणी येसूबाई यांना आपले नऊ वर्षांचे पुत्र शाहूराजे यांच्यासह औरंगजेबाची कैद पत्करावी लागली. पुढे सन १६९९ मध्ये ( जून ) राजाराममहाराज साताऱ्यास आले व त्यांनी आपली नवी राजधानी सातारा झाल्याचे जाहीर केले. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूराजे कैदेतून सुटले ( सन १७०८ ) व साताऱ्यास येऊन सातारा येथे आपला राज्याभिषेक केला. सातारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा हे लहानसे खेडे होते. राजधानीचे ठिकाण झाल्यावर शाहूराजांनी त्याचा विकास केला. त्याच वेळी त्याचे नामकरण शाहूनगर असे करून तेथे काही वाडे बांधले. त्यांपैकी अदालतवाडा व इतर काही वास्तूंचे अवशेष आज साताऱ्यात पाहावयास मिळतात. सातारा किल्ल्याच्या माचीला अदालतवाडा ही वास्तू आजही मोठ्या दिमाखाने उभी आहे. छत्रपती शाहूमहाराजांनी आपले प्रशासन जेव्हा साताऱ्यात सुरू केले, तेव्हा न्यायनिवाडे करण्यासाठी व इतर शासकीय कामांसाठी हा वाडा बांधण्यात आला. १० फूट उंचीच्या जोत्यांवर उभा असलेला ६७ मीटर लांब व ४८ मीटर रुंद असा हा वाडा जवळजवळ ३०० वर्षे अभेद्य ...

तुळशीबाग, पुणे / Tulshibaug, Pune

तुळशीबाग, पुणे ओंकारेश्वराची माहिती देताना डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिले होते की , एखाद्या देवाचेही नशीब असायला लागते. तुळशीबागेतल्या श्रीरामाबद्दलही आज नाइलाजाने असे म्हणणे प्राप्त आहे, कारण तुळशीबागेतल्या विविधरंगी दुकानांतून खरेदीची झुंबड उडविणाऱ्या तरुण पिढीतील मुली, स्त्रिया, आज देखल्या देवा दंडवत याप्रमाणेही श्रीरामाचे दर्शन न घेताच परत फिरतात, ही वस्तुस्थिती आहे. सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात चेष्टेने लिहिलेली वाक्ये तंतोतंत खरी ठरावीत, किंबहुना चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपासूनच , हा केवळ दैवदुर्विलास आहे. ते लिहितात, " पुण्यात खास बायकांसाठी बांधलेला तुळशीबाग नावाचा बाजार असून त्यात श्रीरामाचे देऊळही आहे. " आजची परिस्थिती बघता असे विधान आश्चर्यकारक वाटणार नाही. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी मात्र अशी परिस्थिती नव्हती. त्या काळी पुण्यातील स्त्रिया, मुली खास करून देवदर्शनासाठी या तुळशीबागेत येत असत. एवढेच नव्हे, तर पुराण-कीर्तन ऐकण्यासाठीही आबाल-वृद्धांची गर्दी होत असे. अगदी पहाटेपासून तुळशीबागेत भक्तमंडळींची लगबग चालू हो...

धोम धरण, धोम ( सातारा ) / Dhom Dam, Dhom ( Satara )

धोम धरण, धोम (सातारा  ) महाबळेश्वर येथूनच कोयनेच्या बरोबरीने उगम पावलेली कृष्णा नदी पूर्वेकडे दरीत झेपावते आणि वाईच्या दिशेने मार्गक्रमण करते. या वाईजवळ धौम्य ऋषींच्या आश्रमामुळे प्रसिद्ध पावलेल्या धोम गावाजवळ धोम धरण बांधलेले आहे. सन १९७८ मध्ये हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे कृष्णेवरील पहिले धरण होय. या धरणाची पाणी साठवण क्षमता १४ टीएमसी असून या धरणातील पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. वाई , सातारा , जावळी , कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यांना या सिंचनाचा लाभ होतो. यावर ४ मेगावॅट क्षमतेचा जल उर्जा प्रकल्प आहे. हे धरण सातारा शहरापासून ४४ कि.मी. (वाई पासून ९ कि.मी.) अंतरावर आहे. बोट क्लबची सुविधा येथे उपलब्ध असून पांचगणी येथील टेबल लँड वरून सुद्धा बोट क्लब व बोटिंगची  दृश्ये पहावयास मिळतात. मत्स्य संवर्धनाची कामे या ठिकाणी चालतात. धोम येथील श्री नरसिंहांचे मंदिर व सिद्धेश्वर मंदिर पाहण्याजोगे आहे. Instagram ID : @travelwala.chora

वाड्यांचा इतिहास / History Of Wadas

   वाड्यांचा इतिहास " वाडा " हा महाराष्ट्रात विकसित झालेला परंपरागत निवासस्थानाचा प्रकार आहे. हा वास्तुप्रकार पेशवेकाळात उदयास आला. मराठा साम्राज्यात साधारणपणे सतराव्या शतकाच्या शेवटी ते १८१८ पर्यंत (पेशवे ब्रिटिशांच्या अधीन होईपर्यंत) वाडासंस्कृती पुण्यात भरभराटीस आली. पुढे १९ व्या शतकातही वाडे बांधले गेले, परंतु पेशवेकाळातच वाड्यांची खऱ्या अर्थाने भरभराट झाली. पेशवा बाजीराव ( पहिला ) यांनी पुण्यास राजधानी हलविली. बाजीरावानी १७३०-३२ च्या सुमारास ‘शनिवार– वाडा‘ हा राजेशाही वाडा बांधला. त्यानंतर अठराव्या शतकाच्या मध्यावर पुण्यात अनेक मंदिरे, घाट आणि वाडे बांधले गेले. बाजीराव ( पहिला ) यांनी पुण्याला राजधानी बनविले, त्याआधी पुण्यात सहा पेठा अस्तित्वात होत्या. पेठ बांधणे हा सरकारी आणि खाजगी असा संयुक्त उपक्रम असे. त्याकाळी राज्यकर्ते आपल्यातल्या विश्वासू माणसांस पेठ बांधण्याचा हक्क, परवानगी आणि जबाबदारी द्यायचे. पेठा बांधण्याचे काम सरकारी नियोजन आणि तात्कालिक निर्णय यातून पूर्णरुपास यायचे. पेशवाईच्या काळात पेठा बांधण्याच्या कामाला औपचारिक स्वरूप आले. या काळात पेठा बा...

अमृतेश्वर मंदिर , रतनवाडी / Amruteshwar Temple , Ratanwadi

अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी हेमाडपंती स्थापत्यशैलीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक शिवालय म्हणजे रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिर. मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला एक अर्धमंडप आहे. पुढे एक मंडप, अंतराळ व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आहेत. अगदी वरती कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत. या मंदिराला ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. 🍁 माहिती स्त्रोत : अन्तरजाल 🙏

सारसबाग , पुणे / Sarasbaug , Pune

सारसबाग , पुणे   शहरातल्या सर्वाधिक वर्दळीच्या परिसरात असूनही जिचे आकर्षण आजतागायत कायम आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची पावले जिथे पडतात, ती म्हणजे सारसबाग. पुण्याच्या इतिहासप्रसिद्ध ठिकाणांमध्ये सारसबागेला पुण्याची शान म्हटल्यास नक्कीच ते वावगे ठरणार नाही. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक ' सारस बाग ' असे नाव ठेवले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श...

वीर कोयाजी बांदल यांची समाधी, भोर / Samadhi Of Veer Koyaji Bandal

वीर कोयाजी बांदल समाधिस्थळ  नेकलेस पॉईंट पासुन हाकेच्या अंतरांवर मुख्य वाटेपासुन आडबाजूला झाडीत स्वराज्य स्थापनेच्या उभारणीसाठी झटलेल्या अगणित वीर योद्धांपैकी एक योद्धा विसावलाय. स्वराज्यातील मानाच्या तलवारीच्या पहिल्या पात्याचा मान मिळवलेलं बांदल घराणं. शाहिस्तेखानाच संकट स्वराज्यावर येऊन धडकले होते.याच शाहिस्तेखानाला मातित गाडण्यासाठी बारा मावळची ४०० रनमर्दानची फौज तयार केली.याच फौजेत "हिरडस मावळचे कोयाजीराजे नाईक-बांदल" हे ही होते. या लढाई मध्ये शाहिस्तेखानाची पळता भुई करुन सोडल होत. या लढाईत पराक्रमांची शर्त लढवत असताना कोयाजीराजे नाईक-बांदल धारातिर्थ पडले. नेकलेस पॉइंट पासुन थोड्याच अंतरांवर या योद्ध्याचे समाधिस्थळ आहे. पण ना तिथे कोणती पाटी आहे ना कोणती माहिती त्यामुळे तिकडे फारसं कोणी फिरकत ही नाही. आपल्यासारख्या भटक्यांची पावलं कधी पडतील याच प्रतिक्षेत हे स्थळ आजही वाट पहात आहे. जेव्हा केव्हा तुम्ही इथून जाल तेव्हा नतमस्तक व्हायला विसरु नका अन जमलंच तर एखादं रानफुल ही अर्पण करायला विसरु नका. 🍁

श्री विठ्ठल मूर्ती, दिवे घाट / Shree Vitthal Statue , Dive Ghat

दिवे घाटातील विठ्ठलाची साठ फुटी भव्य मूर्ती वारकरी आणि पुणेकरांसाठी भक्तिमय आकर्षण आहे. विजय कोल्हापुरे आणि बाबासाहेब कोल्हापुरे या वारकरी बंधूंच्या राजराजेश्र्वर सेवाभावी संस्थेतर्फे ही मूर्ती उभारण्यात आली. मूर्तिकार सागर भावसार यांनी ही मूर्ती साकारली असून यामध्ये सिमेंटसह काही धातुंचाही वापर करण्यात आला आहे. मूर्तीचे मुख्य आकर्षण असलेल्या टीळयाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. ही भव्य मुर्ती बनवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. घाटाच्या माथ्यावर असल्यामुळे अनेक प्रवाशांचा प्रवास सुखद करणारी ही मूर्ती हक्काच्या वारकऱ्यांची आतुरतेने वाट पाहत असते. “दिवेघाट चढून आल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा आणि भक्तांचा थकवा दूर व्हावा एवढीच माझी इच्छा होती. विठूरायाकडे मी दुसरं काहीच मागत नाही. ही मुर्ती घडवण्याचं काम गेली दोन वर्ष सुरु होतं,” असं विजय कोल्हापूरकर यांनी सांगितलं आहे.

मस्तानी तलाव , पुणे / Mastani Lake , Pune

मस्तानी तलाव , पुणे  पुणे शहराच्या आजूबाजूला अशी बरीच ऐतिहासिक ठिकाणे आहेत जी कायम खुणावत असतात. पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला वडकी गावाजवळ असाच एक ठिकाण आहे, ज्याला ' मस्तानी तलाव ' या नावानं ओळखलं जातं. या तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची पत्‍नी मस्तानी हिचे नाव देण्यात आले आहे.  दिवे घाटाच्या पायथ्याशी बांधलेला हा तलाव आजही आपल्या इतिहासाच्या खुणा जपून आहे. सध्या रस्ता झाल्याने जाणे देखील सुकर झाले आहे, त्यामुळे स्वतःची गाडी घेऊन जाणे कधीही उत्तम पर्याय आहे. तसे पहायला गेले तर हे पेशवे काळातील एखादे छोटे धरण असावे कारण याची नीट रचना आपण पाहिली तर याला एक बंधारा आपल्याला पहायला मिळतो. दिवे घाटाच्या डोंगरातून पावसाचे पाणी येऊन हे सगळे पाणी या बंधाऱ्यामध्ये साठवले जाते. या बंधाऱ्याला सुंदर कामान देखील आहे. साधारणपणे जवळपास ६ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या तलावाच्या बंधाऱ्याची उंची ही जवळपास १५ फुट आहे . तलावाच्या इथे आपल्याला एक भू...

महात्मा फुले मंडई , पुणे / Mahatma Phule Mandai , Pune

महात्मा फुले मंडई , पुणे   " पुणे तिथे काय उणे " ही म्हण अगदी सार्थ आहे! काळानुसार सांगायचं तर पाताळेश्वर, कसबा गणपती, जोगेश्वरी, पर्वती, शनिवारवाडा असे जुनेपणाचे टप्पे सांगता येतील. पण पुणेकर मंडईला कधीच विसरू शकणार नाहीत. का तर ती त्यांची अन्नदाता आहे. मंडई होण्यापूर्वी बाजारहाट वगैरे शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात भरत असे. मंडई नव्हती तेव्हा तिच्या जागी खाजगीवाले यांची चारएक एकर जागा मोकळी पडून होती. पुण्याची वाढती लोकसंख्या आणि गरजा ध्यानी घेऊन नगरपालिकेने 1882 साली मंडई उभारण्याचा ठराव केला. त्याला महात्मा फुले, हरि रावजी चिपळूणकर अशा काही सभासदांनी विरोध केला. मंडई उभारणीला अडीच-तीन लाखांचा जो खर्च येईल तो शिक्षणकार्यासाठी खर्च करावा अशी त्यांची भूमिका होती. पण ठराव मंडईच्या बाजूने बहुमताने संमत झाला आणि बांधकामाला सुरुवात झाली. वासुदेव बापूजी कानिटकर या कंत्राटदारांकडे काम सोपवण्यात आले. कानिटकर हे अनुभवी कंत्राटदार होते. त्यांनी पुणे नगर वाचन मंदिर , आनंदाश्रम, फर्ग्युसन कॉलेज अशी " भव्य " कामे त्याआधी केलेली होती. कानिटकर कॉंण्ट्रॅक्ट मिळताच कामा...

श्री चिंतामणी विनायक मंदिर, थेऊर, पुणे / Shri Chintamani Vinayaka Temple, Theur, Pune

श्री चिंतामणी विनायक मंदिर ,  थेऊर थेऊरच्या चिंतामणीबद्दल असे सांगितले जाते की ॐकारस्वरूपाने आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली आणि त्याच्यावर सृष्टी निर्माण करण्याची जबाबदारी सोपविली. ब्रह्मदेव कार्य करू लागला, परंतु त्याच्या मनात माझ्याशिवाय कोणाचे काहीही चालणार नाही, असा अहंभाव निर्माण झाला. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या हातून सृष्टिनिर्मितीच्या कार्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. ब्रह्मदेवाच्या चित्ताला काम-क्रोध-लोभ-मोह-मद आणि मत्सर हे षड्रिपू त्रास देऊ लागले आणि ब्रह्मदेवाचे चित्त अस्थिर झाले, त्या वेळी देवर्षी नारदांनी चिंतामणी गणेशाची उपासना करावयास सांगितली. क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरोधक या चित्ताच्या पाच भूमिका असून, त्यांना प्रकाशमान करणारा चिंतामणी असतो. त्याच्या आराधनेने चित्ताच्या या पाच अवस्था नष्ट पावून शांती प्राप्त होते. म्हणून नारदाने ब्रह्मदेवाला अर्धागिनीसमवेत ओंकाराची तपश्चर्या करण्यास सांगितले. नजीकच्या काळात ब्रह्मदेवाने मुळा-मुठा नदीच्या पात्रात एका पायावर उभे राहून ॐकाराची उग्र अनुष्ठाने केली. ॐकारदेव ब्रह्मदेवाला प्रस...

गड व त्यांचे प्रकार.

प्रकार – गडाचे प्रामुख्याने गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भूदुर्ग, असे प्रकार पडतात. 1) भुदुर्ग – नावाप्रमाणेच ,सपाट जमिनीवर, मोकळ्या जागेत, तटबंदी, खंदक इ गोष्टींनी वेढलेला गड भुईकोट या प्रकारात मोडतो. उदा : चाकण ,परांडा ,नळदुर्ग इ. 2) गिरीदुर्ग – उंच डोगरांगामध्ये एखाद्या डोंगराच्या, पर्वताच्या शिखरावर, माथ्यावर बांधलेला गड म्हणजे गिरीदुर्ग होय. उदा: रायगड, तोरणा, राजगड इ. 3) जलदुर्ग – पुर्णपणे पाण्याने वेढलेल्या खडकावर, बेटावर, समुद्रात पाण्यामध्ये बांधलेला तटबंदीयुक्त किल्ला म्हणजे जलदुर्ग होय. उदा : सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, जंजिरा इ. 4) वनदुर्ग – घनदाट अरण्याने, झाडीने वेढलेले दुर्गम गड वनदुर्ग या प्रकारात मोडतात. उदा: वासोटा. 5) जोडकिल्ले – एकाच डोंगरावर,वेगवेगळ्या शिखरावर,जवळपास असलेले गड जोडकिल्ले म्हणून ओळखतात. उदाः पुरंदर -वज्रगड, चंदन-वंदन. यासंदर्भात आज्ञापत्रात उल्लेख सापडतो. “एका गडासमीप दुसरा पर्वत,किल्ला असू नये, असल्यास तो सुरूंग लावून गडाचे आहारी आणावा, जर शक्य नसेल तर बांधून ती जागा मजबूत करावी.“ 6) गडाची तटबंदी – कोणत्याही गडाची तटबंदी म्हणजे एकप्रकारे गडाचे चिलख...

Bhuleshwar Temple , Malshiras / भुलेश्वर मंदिर, माळशिरस

भुलेश्वर मंदिर, माळशिरस   भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण "मंगलगड" असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवर्‍यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवर्‍या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म...