Skip to main content

Posts

Showing posts with the label कसबा पेठ

श्री कसबा गणपती मंदिर, कसबा पेठ - पुणे / Shree Kasba Ganpati, Kasba Peth - Pune

श्री कसबा गणपती मंदिर, कसबा पेठ - पुणे पुण्याच्या इतिहासात डोकावले तर पुण्याची मूळ वस्ती कसबा पेठेच्या भागात होती. 'कस्ब' या फारसी शब्दापासून कसबा शब्द आला असून त्याचा अर्थ होतो कारागिरी. कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदैवते. शुभकार्याची पहिली अक्षत ठेवण्याची येथे परंपरा आहे. अगदी 'लोकमान्य' बाळ गंगाधर टिळक यांच्याकडे झालेल्या मंगलकार्याची अक्षत येथे ठेवली गेली होती. कधीकाळी 'गोविंदाग्रज' म्हणजेच राम गणेश गडकरी यांनी नाटक लिहिल्यावर कसबा गणपतीसमोर ठेवून प्रार्थना केली होती. त्यांचा राहता वाडा येथून जवळच असलेल्या पिंपळाच्या पारासमोर होता. कसबा गणपतीबद्दल अनेक आख्यायिका सुद्धा रूढ आहेत. आज आपण या प्रसिद्ध गणपतीबद्दल जाणून घेऊयात. कसबा गणपती म्हटलं की राजमाता जिजाऊ व बालशिवबा यांचा मंदिराशी आलेला संबंध आपणास दिसतो. आदिलशाहीत पुणे शहाजीराजांकडे जहागिरी होती. जिजाऊ महाराज व शिवराय पुण्यात असताना मंदिर बांधले गेले. तेव्हा मंदिराजवळ असलेल्या लालमहालात शिवराय आणि राजमाता जिजाऊंचे वास्तव्य होते. आपल्याला इतिहासात एका अस्सल पत्रात उल्ले...

सरदार मुजुमदार वाडा, कसबा पेठ - पुणे / Sardar Mujumdar Wada, Kasba Peth - Pune

सरदार मुजुमदार वाडा, कसबा पेठ - पुणे  मुजुमदार (मूळ शब्द - मजमू (फारसी)) म्हणजे महसूल गोळा करणारा. श्रीमंत पेशवे यांच्याकडून जी आज्ञापत्रे, राजपत्रे, देणग्या, सनदा, जहागिऱ्या दिल्या जात त्यांची नोंद मुजुमदारांच्या दप्तरात होऊन त्यावर त्यांच्या सहीचा शिक्का पडल्यावर तो कागद कायदेशीर ठरत असे. या घराण्याचे मूळ पुरुष नारो गंगाधर यांना इ. स. १७१४ मध्ये शाहू महाराजांकडून संपूर्ण राज्याचा मजमूचा अधिकार मिळाला. या नारो गंगाधर यांनी पुढे संन्यास घेतला. त्यांच्या निधनानंतर या वाडय़ाजवळच त्यांची समाधी बांधली आहे. सरदार मुजुमदार यांच्या वाडा १९४८ सालची गोष्ट. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यामधील कसबा पेठेतील सरदार मुजुमदार यांच्या वाडय़ात पं. भीमसेन जोशी प्रथमच गाणार होते. त्यांची ओळख करून देताना आबासाहेब मुजुमदार म्हणाले, ‘याच गादीवर प्रख्यात गायक अब्दुल करीम खाँ यांचे गायन झाले आहे. रसिकांना शास्त्रीय संगीताची गोडी लावणारे त्यांचे शिष्य सवाई गंधर्व यांचेही गायन इथे झाले आहे आणि आज गंधर्वाचे शिष्य भीमसेन जोशी हेदेखील इथे गाणार आहेत. म्हणजे एका अर्थाने संगीत क्षेत्रातील गुरुकुलाची पर...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...