सरदार गोदाजी राजे जगताप यांचे समाधी स्थळ सासवड येथे संगमेश्वर मंदिराचे उत्तर बाजुस असणाऱ्या रस्त्याचे पश्चिम बाजुस पूर्वभिमुख एक छोटीशी घुमटी आहे. ही घुमटी म्हणजे पराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप यांची समाधी होय. समाधी ची अवस्था फार बिकट असून बरचसे बांधकाम काळाच्या ओघात कोसळले आहे. सरदार गोदाजी जगताप म्हणजे छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एक मानाचे पान. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज या तिन्ही छत्रपतींचा कार्यकाळ अनुभवलेले सरदार म्हणजे गोदाजी जगताप. सासवड परगण्याचे देशमुख, स्वराज्यासाठी झालेली खळद बेलसर लढाईचे सरदार, तसेच शेवटच्या काळात ३५००० पायदळाची सरनोबत की होती. पराक्रमी स्वामीनिष्ठ श्रीमंत गोदाजी राजे जगताप देशमुख यांची वैभवशाली कारकीर्द. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबां...