Skip to main content

Posts

Showing posts with the label बुधवार पेठ

गुरुजी तालीम गणपती, पुणे / Guruji Talim Ganpati, Pune

श्री गुरुजी तालीम गणपती (  पुण्याचा राजा ) मनाचा तीसरा गणपती बुधवार पेठ - पुणे पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीचे यंदा १३६ वे वर्ष आहे. या गणपतीला आजुन एका नावानं ओळखला जातं - ते म्हणजे " पुण्याचा राजा" . १८८७ साली भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीपासून या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. पुण्यात असलेल्या एका तालमीमध्ये हा गणपती बसविण्यास सुरवात झाली होती. आता तालीम अस्तित्वात नाही. मूषकारूढ स्वरूपातील शाडूच्या मातीची मूळ मूर्ती १९७२ साली बनवण्यात आली होती. मंडळाचे कार्यकर्ते आणि तत्कालीन नगरसेवक श्यामसिंग परदेशी यांच्या पुढाकारातून ही मूर्ती घडवून घेतली गेली होती. दरवर्षी रंग देऊन ती मूर्ती उत्सवात ठेवली जात होती. काही वर्षापुर्वी फायबरची मूर्ती तयार करून घेण्यात आली. हीच मूर्ती आता सांगता मिरवणुकीत ठेवण्यात येते. मुर्तीसाठी दहा किलो सोन्याचे आणि वीस किलो चांदीचे दागिने कार्यकर्त्यांच्या सह...

तुळशीबाग श्री राम मंदिर, बुधवार पेठ ( पुणे ) / Tulshibaug Shree Ram Temple, Budhwar Peth ( Pune )

तुळशीबाग श्री राम मंदिर, बुधवार पेठ ( पुणे ) पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणले जाते. या सांस्कृतिक राजधानीचे जे अलंकार आहेत त्यातील महत्वाचा एक म्हणजे तुळशीबाग. तुळशीबाग हे प्रसिद्ध व ऐतिहासिक ठिकाण. येथील रामाचे मंदिर व परिसर हे आजही अनेकांना कायम खुणावत असते. हे मंदिर बांधले नारो आप्पाजी तुळशीबागवाले यांनी. नारो आप्पाजी हे पेशवाईतले प्रसिद्ध व कर्तबगार व्यक्तिमत्व. त्यांचे मूळ आडनाव ' खिरे ' होते. यांचे वडील सातारा जिल्ह्यातील पाडळी गावाचे जोशी-कुलकर्णी. श्री रामदास समर्थांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या पाडळी येथे नारो आप्पाजी यांचा जन्म झाला. नारो अप्पाजींचे मूळ नाव नारायण असे होते व मुंज होईपर्यंत त्यांचे वास्तव्य पाडळी येथेच होते. त्यामुळे रामोपासनेचा वसा त्यांना लहान वयातच मिळाला असावा. एक दिवस नारो आप्पाजी आई वर रुसून पुण्याला आले व तिथेच त्यांची गोविंदराव खासगीवाले यांच्याशी गाठ पडली. त्यावेळी खासगीवाले यांनी लहानग्या नारायणास आश्रय दिला जिथे आता सद्य राम मंदिर आहे. त्या काळी या जागेत श्री खासगीवाले यांची तुळशीची बाग होती. तेथून लहानग्या नाराय...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, बुधवार पेठ - पुणे / Shrimant Dagluseth Halwai Ganpati, Budhwar Peth - Pune

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, बुधवार पेठ - पुणे गणेशोत्सव म्हटला की मोठ्या शहरांतील काही गणपतींची नावे विशेषत्त्वाने समोर येतात. त्यामध्ये पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे नाव आघाडीवर आहे. बाहेरगावहून पुण्यात आलेला व्यक्ती दगडूशेठच्या दर्शनासाठी गेला नाही असे फारच क्वचित घडत असावे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे १८ व्या शतकातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, " आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे न...