Skip to main content

Posts

Showing posts with the label Saswad

सरदार गोदाजी राजे जगताप यांचे समाधी स्थळ, सासवड / Samadhi Of Sardar Godaji Raje Jagtap, Saswad

सरदार गोदाजी राजे जगताप यांचे समाधी स्थळ  सासवड येथे संगमेश्वर मंदिराचे उत्तर बाजुस असणाऱ्या रस्त्याचे पश्चिम बाजुस पूर्वभिमुख एक छोटीशी घुमटी आहे. ही घुमटी म्हणजे पराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप यांची समाधी होय. समाधी ची अवस्था फार बिकट असून बरचसे बांधकाम काळाच्या ओघात कोसळले आहे. सरदार गोदाजी जगताप म्हणजे छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एक मानाचे पान. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज या तिन्ही छत्रपतींचा कार्यकाळ अनुभवलेले सरदार म्हणजे गोदाजी जगताप. सासवड परगण्याचे देशमुख, स्वराज्यासाठी झालेली खळद बेलसर लढाईचे सरदार, तसेच शेवटच्या काळात ३५००० पायदळाची सरनोबत की होती. पराक्रमी स्वामीनिष्ठ श्रीमंत गोदाजी राजे जगताप देशमुख यांची वैभवशाली कारकीर्द. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबां...

श्री विठ्ठल मूर्ती, दिवे घाट / Shree Vitthal Statue , Dive Ghat

दिवे घाटातील विठ्ठलाची साठ फुटी भव्य मूर्ती वारकरी आणि पुणेकरांसाठी भक्तिमय आकर्षण आहे. विजय कोल्हापुरे आणि बाबासाहेब कोल्हापुरे या वारकरी बंधूंच्या राजराजेश्र्वर सेवाभावी संस्थेतर्फे ही मूर्ती उभारण्यात आली. मूर्तिकार सागर भावसार यांनी ही मूर्ती साकारली असून यामध्ये सिमेंटसह काही धातुंचाही वापर करण्यात आला आहे. मूर्तीचे मुख्य आकर्षण असलेल्या टीळयाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. ही भव्य मुर्ती बनवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. घाटाच्या माथ्यावर असल्यामुळे अनेक प्रवाशांचा प्रवास सुखद करणारी ही मूर्ती हक्काच्या वारकऱ्यांची आतुरतेने वाट पाहत असते. “दिवेघाट चढून आल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा आणि भक्तांचा थकवा दूर व्हावा एवढीच माझी इच्छा होती. विठूरायाकडे मी दुसरं काहीच मागत नाही. ही मुर्ती घडवण्याचं काम गेली दोन वर्ष सुरु होतं,” असं विजय कोल्हापूरकर यांनी सांगितलं आहे.

श्री संगमेश्वर मंदिर , सासवड / Shree Sangameshwar Temple , Saswad

संगमेश्वर मंदिर , सासवड   पुण्यापासून ३५ किलोमीटरच्या अंतरावर , सासवड गावात संगमेश्वर हे पांडवकालीन स्वंयभू महादेवाचे मंदिर आहे. कऱ्हा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर संगमेश्वर आहे. मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर दृष्टिस पडतो तो स्थापात्य आणि शिल्प कलेचा अदभुत नजारा. तीस दगडी खांबावर उभारलेला प्रवेश मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या दीपमाळा, प्रवेश मंडपातील नंदी, मंदिरातील कोरीव कासव, मंदिरावरील सुबक नक्षीकाम नजरेत साठवून ठेवावसं वाटतं. प्रवेश मंडपाच्या दक्षिणोत्तर प्रवेश दार आहेत. विशेष म्हणजे या मंदिरातील नंदिचे तोंड पश्चिमेस आहे. मंदिराच्या परिसरातील तुळशी वृंदवनाची रचना ही कल्पक आहे. ७ ते ८ फुट उंचीच्या या तुळशीवृंदावनात वर तुळस मध्यभागी शिवलिंग आणि खाली पाया. तुळशीला घातलेले पाणी मध्यभागी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडते. मंदिराच्या दक्षिणेस घाट व कऱ्हा तीर आहे. या तीरावर खडकेश्वर आणि सतींची मंदिरे आहेत. उत्तरेला चांबळी च्या तीरावर ही महादेवाचं मंदिर आहे.

सरदार पुरंदरे वाडा , सासवड / Sardar Purandare Wada , Saswad

सरदार पुरंदरे वाडा , सासवड  शके १६२५ ( सन १७०३ ) मधील एका पत्रात 'कसबे' सासवडचे कुलकर्ण व कर्यात सासवडचे कुलकर्ण पदाबद्दल समस्त पुरंदरे यांनी अत्र्यांशी वाद घातले अशी नोंद आहे. शके १६१४ ( सन १६९२ ) च्या फाल्गुन महिन्यात तुकोपंत पुरंदरे, धनाजी जाधवांबरोबर चंजीस ( जिंजीस ) जाऊन जमिनीच्या सनदा घेत आहे, अशी एका पत्रात नोंद आढळते. यावरून असे म्हणता येईल की, पुरंदरे घराण्याकडे परंपरागत कुलकर्ण वतन होते. या घराण्यातील अंबाजीपंत ही व्यक्ती धनाजी जाधवराव यांच्या बरोबरीचीच असल्याचे दिसते. शके १६१४ मध्ये पुरंदरे मराठ्यांचे साक्षात नोकर होते. शके १६२४ मध्ये ते सुखवस्तू रयत आहेत. सासवड गाव कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे असे. शके १६२३ मध्ये अत्रे आणि पुरंदरे यांचा वाद असल्याचे दिसते. रामचंद्रपंत अमात्य, सेनापती धनाजी जाधवराव, सचिव शंकराजी नारायण यांच्याशी पुरंदरे यांचा दृढ परिचय होता. या घराण्यातील 'हेरंब' नावाचा माणूस बराच महत्त्वाचा होता. तुको त्र्यंबक, अंबाजी त्र्यंबक या बंधुद्वयाखेरीज त्यांचे चुलत भाऊ काशी, गोमाजी, गिरमाजी, विश्वनाथ व भाऊबंद चिंतो महादेव पुरंदरे ...