Skip to main content

Posts

Showing posts with the label भारत

मूर्तिभंजन आणि मंदिरविध्वंस

मूर्तिभंजन आणि मंदिरविध्वंस इस्लामी राजवटींचे मुख्य वैशिष्ट्य होते मूर्ती फोडणे आणि देवळे पाडणे. त्यांचे अनुकरण भारतातील इस्लामी राज्यकर्त्यांनी कसे केले याची काही उदाहरणे पुढे देतो. मुहम्मद घोरीने ११९२ साली पृथ्वीराज चौहानाचा पराभव करून त्याला ठार मारले. त्यानंतर आपला गुलाम कुत्बुद्दीन ऐबक याला भारतात ठेवून घोरी गझनीला परत गेला. घोरी मेल्यावर कुत्बुद्दीन ऐबकच इथला सुलतान झाला. या कुत्बुद्दीन ऐबकाने मुहम्मद घोरीच्या आज्ञेवरून दिल्लीत एक मोठी मशीद बांधली. सत्तावीस बुतखान्यांचे म्हणजे मूर्तिमंदिरांचे साहित्य वापरून ती मशीद बांधली आहे असा फार्सी शिलालेखच तिच्यावर आहे. आता ती मशीद पडक्या अवस्थेत आहे आणि पुरातत्त्वखात्याच्या ताब्यात आहे. आजही तिथे हिंदू आणि जैन मंदिरांचे अवशेष पहायला मिळतात. कुत्बुद्दीन ऐबकच्याच काळात मुहम्मद बख्तियार खिलजी या त्याच्या सरदाराने १२०२ मध्ये बिहारमधील एक मोठा बौद्ध विहार पाडून टाकला आणि तिथल्या बौद्ध भिक्षूंची कत्तल केली. ती सर्व हकीगत तत्कालीन इतिहासकार मिन्हाजुद्दीन याने तबकात-इ नासिरी या त्याच्या फार्सी ग्रंथात लिहून ठेवली आहे. त्याच सुमाराला प्...

टपाल पेटीचा इतिहास / History Of Letterbox

टपाल पेटी  - भारतात १७६६ साली लॉर्ड क्लाइव्हने फक्त सरकारी कामकाजाकरिता टपाल सेवा सुरू केली. आधुनिक टपाल सेवा आम जनतेसाठी १८३७ साली खुली करण्यात आली. १५८२ मध्ये पहिले टपाल तिकिट (पोस्टाचे तिकिट) कराची येथे जारी करण्यात आले, तथापि ते केवळ सिंध प्रांतापुरतेच मर्यादित होते. १८५४ मध्ये टपाल विभाग स्थापन करण्यात आला, त्या सुमारास देशात सु. ७०० टपाल कचेऱ्या (डाकघरे) कार्य करीत होत्या. १८८० साली धनप्रेष सेवा (मनीऑर्डर सेवा) चालू करण्यात आली. १८८२ हे वर्ष म्हणजे भारतीय टपाल कार्यालयाच्या कारकीर्दीतील अतिमहत्त्वाचे वर्ष मानले पाहिजे कारण त्या वर्षी डाकघर बचत बँकेने सबंध देशभर कार्य करण्यास प्रारंभ केला. १९८३ साली भारतीय टपाल व तार विभागाने डाकघर बचत बँकेची शताब्दी साजरी करण्यास प्रारंभ केला. रेल्वे-डाक-सेवा व हवाई-डाक-सेवा अनुक्रमे १९०७-१९११ साली सुरू झाल्या. तेव्हापासून आतापर्यंत टपालयंत्रणेत लक्षणीय प्रगती झाल्याचे आढळते. १९५१ ते १९८१ या अवधीत डाकघरे कार्यालयची संख्या चौपाटीने वाढली.  सन्दर्भ : मराठी विश्वकोश Instagram - ©TRAVELWALA.CHORA

तुळशीबाग, पुणे / Tulshibaug, Pune

तुळशीबाग, पुणे ओंकारेश्वराची माहिती देताना डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिले होते की , एखाद्या देवाचेही नशीब असायला लागते. तुळशीबागेतल्या श्रीरामाबद्दलही आज नाइलाजाने असे म्हणणे प्राप्त आहे, कारण तुळशीबागेतल्या विविधरंगी दुकानांतून खरेदीची झुंबड उडविणाऱ्या तरुण पिढीतील मुली, स्त्रिया, आज देखल्या देवा दंडवत याप्रमाणेही श्रीरामाचे दर्शन न घेताच परत फिरतात, ही वस्तुस्थिती आहे. सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात चेष्टेने लिहिलेली वाक्ये तंतोतंत खरी ठरावीत, किंबहुना चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपासूनच , हा केवळ दैवदुर्विलास आहे. ते लिहितात, " पुण्यात खास बायकांसाठी बांधलेला तुळशीबाग नावाचा बाजार असून त्यात श्रीरामाचे देऊळही आहे. " आजची परिस्थिती बघता असे विधान आश्चर्यकारक वाटणार नाही. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी मात्र अशी परिस्थिती नव्हती. त्या काळी पुण्यातील स्त्रिया, मुली खास करून देवदर्शनासाठी या तुळशीबागेत येत असत. एवढेच नव्हे, तर पुराण-कीर्तन ऐकण्यासाठीही आबाल-वृद्धांची गर्दी होत असे. अगदी पहाटेपासून तुळशीबागेत भक्तमंडळींची लगबग चालू हो...