हनुमंतांला शेंदूर अर्पण करण्याची प्रथा कशी सुरु झाली ? ज्ञान, बुद्धी, शिक्षण, पराक्रम, नम्रता, लीनता, भक्तिभाव आणि सामर्थ्यासह अनेक गुण हनुमंतांच्या ठायी दिसून येतात. हनुमंतांना शेंदूर अर्पण करण्याची प्रथा प्रचलित असल्याचे दिसून येते. मात्र, ही प्रथा सुरू होण्यामागे नेमके काय कारण घडले? मारुतीरायाला शेंदूर का अर्पण केला जातो? जाणून घेऊया... हनुमानाला शेंदूर वाहण्यामागे रामायणातील एक प्रसंग कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. एकदा सीता देवी साजश्रुंगार करत होत्या. त्याचवेळेस हनुमान तिथे पोहोचले. सीता मातेला नमस्कार केला. सीता मातेची सात्विकता हनुमंतांना अतिशय भावली. साजश्रुंगार झाल्यावर सीताने भांगेमध्ये शेंदूराची लकीर ओढली. ते पाहून हनुमंताने कुतुहलाने विचारले, माते, हा सुद्धा तुमच्या श्रुंगाराचा एक भाग आहे का?, त्यावर हसून सीता माता म्हणाली की, हनुमंता, बाकीचे अलंकार नसले तरी चालतील, परंतु हा सर्वात महत्त्वाचा सौभाग्यलंकार आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी भांगात शेंदूराची रेघ ओढतात. सीता मातेने दिलेल्या उत्तरावर प्रतिक्रिया देत हनुमान म्हणाले की, पतीला दीर्घायुष्य, म...