Skip to main content

Posts

Showing posts with the label पुणे दर्शन

रहाळकर श्रीराम मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) / Rahalkar Shreeram Mandir, Sadashiv Peth ( Pune )

रहाळकर श्रीराम मंदिर सदाशिव पेठ, पुणे नागनाथपारावरून शनिपाराकडे जाताना डाव्या हाताला श्रीरामतीर्थ या इमारतीमध्ये एक श्रीराम मंदिर आहे. तेच रहाळकर यांचे पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर. या मंदिराच्या नावाची पाटी वेलींनी झाकली गेल्यामुळे हे मंदिर लवकर लक्षात येत नाही. हे मंदिर सुमारे १८३ वर्ष जुने आहे. या मंदिरात श्रीरामाची सिंहासनाधिष्टीत पंचायतन मूर्ती बघावयास मिळते. श्रीराम कार्याचा व स्थळांचा ऐतिहासिक अभ्यास केलेले कै. श्री अमरेंद्र गाडगीळ यांनी ही मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असल्याचे सांगितले. प्राचीन ग्रंथांमध्ये रामरायाच्या अभिषेकाचे जे वर्णन आहे तशी हि मूर्ती आहे, म्हणून त्याला पट्टाभिषिक्त श्रीरामपंचायतन म्हटले जाते. सिंहासनावर बसलेले श्रीराम-सीता डावीकडे शत्रुघ्न व उजवीकडे लक्ष्मण व भरत आहेत. तसेच भालदार- चोपदार, नल-नील, जाम्बूवान, सुग्रीवादी आहेत. एकाच संगमरवरी दगडात हे सर्व कोरुन शिल्पकाराने ही किमया केली आहे. या मंदिरातील रामपंचायतन मूर्ती काही कारणामुळे काकिर्डे सराफांकडे गहाण म्हणून ठेवली होती. ती विकण्याचा मानस त्यांनी प्रकट करताच, श्री गणेशराम बाबा रहाळकर रा...

श्री भाजीराम मंदिर, नारायण पेठ ( पुणे ) / Shree Bhajiram Mandir ( Pune )

श्री भाजीराम मंदिर नारायण पेठ - पुणे केळकर रोडवर असलेल्या केसरी वाड्यावरून अलका चौकाकडे जाताना नारायण पेठ पोलीस चौकीच्या समोर एक १००/१५० वर्षापूर्वीचे राम मंदिर लागते. श्री भाजीराम मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे. हे पेशवेकालीन मंदिर अंदाजे इ.स. १७६१ / ६२ च्या दरम्यान बांधले गेले आहे. हे मंदिर तुळशीबाग राम मंदिराच्या समकालीन आहे. पूर्वी या ठिकाणी भाजी विकायला विक्रेते बसत असत, म्हणून त्या ठिकाणी असलेल्या मंदिराला भाजीराम मंदिर असे नाव पडले. पेशवेकालीन दफ्तरात या मंदिराचा उल्लेख आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून, पूर्वी या मंदिराचा गाभारा दगडी होता. सध्या बांधलेलं मंदिर हे नवीन आहे. मंदिरामध्ये लाकडी नक्षीदार देव्हाऱ्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्ती दगडी चौथऱ्यावर उभ्या आहेत. मूर्तीच्या मागे छोटी नक्षीदार प्रभावळ आहे. श्री रामाच्या मूर्तीवर छोटेसे छत्र लटकवलेले आहे. त्या मूर्ती अंदाजे दोन ते अडीच फुटांच्या आहेत. मूर्तीच्या एका बाजूला शेंदुरचर्चीत गणपतीची लहान मूर्ती तर दुसऱ्या बाजूला संगमरवरी हनुमानाची छोटी मूर्ती आणि काळ्या पाषाणातली महादेवाची पिंड आणि नंद...

सरसेनापती दाभाडे वाडा, तळेगाव दाभाडे ( जि. पुणे ) / Sarsenapati Dabhade Palace ( Wada ), Talegaon Dabhade ( Dist. Pune )

सरसेनापती दाभाडे वाडा, तळेगाव दाभाडे पुणे-मुंबई महामार्गावरील तळेगाव दाभाडे या गावी सरसेनापती दाभाडे यांचा एक भव्य वाडा आहे. ते म्हणजे सरसेनापती दाभाडे वाडा ( जुना राजवाडा ). तळेगाव येथील वाडे जवळ-जवळ पडीक अवस्थेत असून ते नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. त्यांचे उरले-सुरले अस्तित्व आपल्याला पोस्ट मधल्या छायाचित्रांच्या माध्यमातुन लक्षात येईल. हत्ती जातील असा वाड्याचा मुख्य दरवाजा, भव्य विशाल बुरुज, पडीक अवस्थेतील तटबंदी, इमारतींची जोती, काही भिंतींचे अवशेष पाहिल्यावर त्यांचे सरदारी स्वरुप आपल्या नजरेसमोर उभे राहते. पुणे जिल्ह्यात सरसेनापती दाभाडे यांचे वाडे कुठे-कुठे आहे ? १. इंदोरी २. तळेगाव दाभाडे ३. सोमवार पेठ ( पुणे शहर ) सन्दर्भ : १. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे - भाग पहिला ( डॉ. सदाशिव शिवदे )

राष्ट्रीय युद्ध स्मारक, घोरपडी - पुणे / National War Memorial, Ghorpadi - Pune

राष्ट्रीय युद्ध स्मारक, घोरपडी - पुणे नॅशनल वॉर मेमोरियल सदर्न कमांड म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारक, हे पुणे शहरातील घोरपडी येथील एक युद्ध स्मारक आहे, जे स्वातंत्र्योत्तर युद्धातील शहीदांना समर्पित आहे. हे दक्षिण आशियातील एकमेव युद्ध स्मारक आहे जे नागरिकांच्या योगदानातून उभारले गेले आहे. १५ ऑगस्ट १९९८ रोजी स्मारकाचे अनावरण करण्यात आले आणि राष्ट्राला ते समर्पित करण्यात आले. भारतीय सैन्याच्या अनेक कामगिरी जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या सर्वांसाठी हे खुले संग्रहालय आहे. स्मारकात मुख्य स्मृतिस्थळ; तसेच १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे जप्त केलेले रणगाडे प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. कालांतराने या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणारे चित्रप्रदर्शनही नागरिकांसाठी तयार करण्यात आले. तसेच भारत-पाक युद्ध, गोवा मुक्ती संग्राम, भारत-चीन युद्ध, ऑपरेशन पवन; तसेच कारगिल युद्धात दक्षिण मुख्यालयाने राबवलेल्या मोहिमांची माहिती देण्यात आली आहे. परमवीर चक्र विजेत्या २१ वीरांचे अर्धपुतळे बसविण्यात आले असून, त्यांच्या शौर्याची माहिती देणारे शिलालेख लावण्यात आले आहे. ज्या शूरवीरांनी युद्धाच्...

पुण्यावर पुस्तके / Books On Pune

" पुणे " या विषयवार आधारित काही मराठी पुस्तकांची यादी : १ . असे होते पुणे ( म. श्री.दीक्षित ) २ . मुठे काठचे पुणे ( प्र. के. घाणेकर ) ३ . पुणे शहरातील मंदिरे ( डॉ. शां. ग. महाजन ) ४ . सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याचा ( प्र. के. घाणेकर ) ५ . सफर ऐतिहासिक पुण्याची ( संभाजी भोसले ) ६ . हरवलेले पुणे ( डॉ. अविनाश सोवनी ) ७ . पुण्यनगरीतील वाडे व वास्तु ( डॉ. एच. वाय. कुलकर्णी ) ८ . पेशव्यांचे अधिकृत निवासस्थान शनिवारवाडा ( प्र. के. घाणेकर) ९ . पुण्याची पर्वती ( प्र. के. घाणेकर ) १० . नावामागे दडलय काय ( सुप्रसाद पुराणिक ) ११ . पेशवेकालीन पुणे ( रा. ब. दत्तात्रय बळवंत पारसनीस ) १२ . पुणे एकेकाळी ( मंदार लावटे ) १३ . पुणं एक साठवण ( प्रा. श्याम भुर्के ) १४ . पुणे वर्णन ( ना. वि. जोशी ) १५ . हरवलेले पुणे ( ग. वा. बेहरे ) १६ . बदलते पुणे ( डॉ. मा. प. मंगुडकर  ) १७ . आठवणीतले  पुणे ( डॉ   एच. वाय. कुलकर्णी ) १८ . पुणेरी ( श्री. ज. जोशी ) १९ . झुंजार पुणे ( डॉ. के. के. चौधरी ) २० . पेशवेकालीन पुणे शहरातील कोतवाली ( प्रा. डॉ. पुष्कर रमेश शास्त्री...

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...