श्री चिंतामणी विनायक मंदिर , थेऊर थेऊरच्या चिंतामणीबद्दल असे सांगितले जाते की ॐकारस्वरूपाने आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली आणि त्याच्यावर सृष्टी निर्माण करण्याची जबाबदारी सोपविली. ब्रह्मदेव कार्य करू लागला, परंतु त्याच्या मनात माझ्याशिवाय कोणाचे काहीही चालणार नाही, असा अहंभाव निर्माण झाला. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या हातून सृष्टिनिर्मितीच्या कार्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. ब्रह्मदेवाच्या चित्ताला काम-क्रोध-लोभ-मोह-मद आणि मत्सर हे षड्रिपू त्रास देऊ लागले आणि ब्रह्मदेवाचे चित्त अस्थिर झाले, त्या वेळी देवर्षी नारदांनी चिंतामणी गणेशाची उपासना करावयास सांगितली. क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरोधक या चित्ताच्या पाच भूमिका असून, त्यांना प्रकाशमान करणारा चिंतामणी असतो. त्याच्या आराधनेने चित्ताच्या या पाच अवस्था नष्ट पावून शांती प्राप्त होते. म्हणून नारदाने ब्रह्मदेवाला अर्धागिनीसमवेत ओंकाराची तपश्चर्या करण्यास सांगितले. नजीकच्या काळात ब्रह्मदेवाने मुळा-मुठा नदीच्या पात्रात एका पायावर उभे राहून ॐकाराची उग्र अनुष्ठाने केली. ॐकारदेव ब्रह्मदेवाला प्रस...