श्री पार्वतीनंदन गणपती ( खिंडीतला गणपती ), चतुःश्रुंगी - पुणे / Shree Parvati Nandan Ganpati ( Khinditala Ganapti ), Chattushringi - Pune
श्री पार्वतीनंदन गणपती ( खिंडीतला गणपती ), चतुःश्रुंगी - पुणे गणेशखिंडीत ' पार्वतीनंदन गणपती ' किंवा ' खिंडीतला गणपती ' हे एक प्राचीन देवस्थान आहे. गणपती खिंडीत असल्याने कदाचित त्याला खिंडीतील गणपती असे नाव पडले असावे. सेनापती बापट रस्ता विद्यापीठ रस्त्याला ( गणेशखिंड रस्ता ) जेथे मिळतो तेथे हे मंदिर आहे. मंदिरास दगडी गाभारा, दगडी मंडप व लाकडी सभामंडप आहे. मंदिरात दीपमाळा देखील आहेत. मंदिराचा कळस वैशिष्ट्यपूर्ण असून त्यात २०-२५ माणसे मावतील एवढी जागा आहे. शेंदूरचर्चित डाव्या सोंडेची चतुर्भुज मोठी गणेशमूर्ती येथे आहे. सुमारे ४०० वर्षांपासून गणपती अस्तित्वात होता असे म्हटले जाते. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. मातोश्री जिजाबाई पाषाणला असलेल्या सोमेश्वर मंदिरात जात असताना इथे विसावल्या होत्या. तेव्हा येथील एका ठकार नावाच्या ब्राह्मणास दृष्टांत झाला की कसब्यात मी ओढ्याच्या काठी शमी वृक्षाखाली आहे. उत्खनन करून तेथे गजाननाचा स्वयंभू तांदळा मिळाला. राजमाता जिजाऊ यांनी तेथे मंदिर बांधले. ते मंदिर म्हणजेच ग्रामदेव कसबा गणपती मंदिर. या मं...