मस्तानी तलाव , पुणे पुणे शहराच्या आजूबाजूला अशी बरीच ऐतिहासिक ठिकाणे आहेत जी कायम खुणावत असतात. पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला वडकी गावाजवळ असाच एक ठिकाण आहे, ज्याला ' मस्तानी तलाव ' या नावानं ओळखलं जातं. या तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची पत्नी मस्तानी हिचे नाव देण्यात आले आहे. दिवे घाटाच्या पायथ्याशी बांधलेला हा तलाव आजही आपल्या इतिहासाच्या खुणा जपून आहे. सध्या रस्ता झाल्याने जाणे देखील सुकर झाले आहे, त्यामुळे स्वतःची गाडी घेऊन जाणे कधीही उत्तम पर्याय आहे. तसे पहायला गेले तर हे पेशवे काळातील एखादे छोटे धरण असावे कारण याची नीट रचना आपण पाहिली तर याला एक बंधारा आपल्याला पहायला मिळतो. दिवे घाटाच्या डोंगरातून पावसाचे पाणी येऊन हे सगळे पाणी या बंधाऱ्यामध्ये साठवले जाते. या बंधाऱ्याला सुंदर कामान देखील आहे. साधारणपणे जवळपास ६ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या तलावाच्या बंधाऱ्याची उंची ही जवळपास १५ फुट आहे . तलावाच्या इथे आपल्याला एक भू...