रिद्धी सिद्धी गणपती पुण्यातील रिद्धी आणि सिद्धीसह असलेली गणपतीची मूर्ती नागनाथ पार मित्र मंडळाकडे आहे. ही सुरेख मूर्ती सदाशिव पेठेत असून, प्रसिद्ध आहे. नागनाथ पार मंडळ अगदी सुरुवातीच्या काळातील मंडळांपैकी एक ! नरहरी शेठ वासुळकर यांनी या मंडळाची स्थापना केली. बरीच वर्षे येथे निरनिराळ्या प्रकारच्या मूर्ती बसविल्या जात असत. मोरावर बसलेला, कॅरम खेळणाऱ्या अशा विविध मूर्ती मंडळाने बसविल्या होत्या. १९८३ मध्ये मंडळाने कायमस्वरूपी मूर्ती करण्याचे ठरविले, तेव्हा मंडळाचे पुरोहित श्रीकांत काळे यांनी सांगितले, की पुराणात सांगितल्याप्रमाणे मूर्ती केली पाहिजे. त्यानुसार यशवंत वासुळकर, विजय सोमवंशी, वसंत पठारे आदींनी वेदाचार्य घैसास गुरुजींची भेट घेतली. गुरुजींनी पेणच्या मधुकर भोईर यांचे नाव सुचविले; तसेच मूर्तीचे काम सूर्योदय ते सूर्यास्त याच काळात केले जावे असे सुचविले. त्यानुसार मूर्तीची छोटी प्रतिकृती करण्यात आली. ती पसंत पडल्यावर सध्याची मूर्ती करण्यात आली. हे काम एक वर्ष सुरू होते. १९८४ मध्ये वेदाचार्य घैसास गुरुजींच्या हस्तेच विधिवत यंत्र बसवून, मूर्तीची स्थापना करण्यात आली. ही मू...