Skip to main content

Posts

Showing posts with the label Koregaon Bhima

१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव ( जयस्तंभ )

सदर पुस्तकाच्या नावातूनच पुस्तकाचा आशय कळून येतो. पण लेखकांच्या 'वास्तव' शब्दाचा अर्थ आत्ता 'विस्तव' म्हणून घेतल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण काही समाजकंटकांकडून सारखा हा विस्तव भडकवला जात आहे.  इतिहास अशी गोष्ट आहे, जिथे 'ध चा मा' झाला तरी एखाद्या व्यक्तीचे आयुष्य संपते. म्हणून तत्कालीन कागदपत्रे, शिलालेख, झालेला पत्रव्यवहार यांवरच इतिहास अभ्यासला जातो. पण वाईट गोष्ट अशी की, असा इतिहास अभ्यासणाऱ्याला सध्या फक्त ट्रोल केले जाते. आपले अज्ञान आणि असत्याचा प्रोपोगंडा हीच याची कारणे देता येतील.  कोरेगाव भीमा, भीमा नदीच्या काठावर असलेले एक खेडे म्हणून या गावाला 'कोरेगाव भीमा' नाव मिळाले. पुढे याच गावच्या हद्दीत एक चकमक झाली, त्याला लढाई संबोधले गेले. ही लढाई होती मराठा विरुद्ध इंग्रज... इंग्रजांनी संपूर्ण भारत ताब्यात घेतल्यानंतरही फक्त मराठे त्यांना विरोध करत होते, हे सर्वश्रुत आहे. पण मराठ्यांमधील अंतर्गत वादात इंग्रजांनी मध्यस्ती करण्याच्या बहाण्याने हळू हळू मराठी सत्ता खिळखिळी करून टाकली. अशीच एक कोरेगावची लढाई.  ३१ डिसेंबर १८१७ रोजी मराठा गादी...