गरुड शिल्प बऱ्याच वेळेला आपण किल्ल्यांवर फिरायला जातो तेव्हा अनेक प्रकारची शिल्पे पाहतो. काही प्रवेशद्वारांवर तर काही वाडयाच्या भिंतींवर, काही भिंतींवरील चित्रांवर तर काही नाण्यांवर ! त्यातून एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आढळून येते, ते म्हणजे ' गरुड शिल्प '. भारतवर्षात गरुडाला फार मोठे स्थान आहे. अनेक प्राचीन राज्ये आणि त्यांचे राजे गरुडाची पूजा करत असत. हिंदुस्थानात गरुडाच्या अनेक मूर्ती आढळून येतात. बघायला गेलं तर अनेक ठिकाणी गरुडाची मूर्ति अर्धमानवी आणि अर्धपक्षी स्वरूपात आढळतात. काही मूर्ती बसलेल्या अवस्थेत आहेत तर काही उभ्या. महाराष्ट्रात वैष्णव परंपरेत तयार केलेल्या गरुडाच्या मूर्ती या दोन हातांच्या असून त्या सदैव हात जोडलेल्या स्थितीत म्हणजेच ' अंजली ' मुद्रेत असतात. बरयाच वेळा काही काही गरुडमूर्तीना चार हातसुद्धा असतात, ज्याला ‘ वैनतेय ’ म्हणतात. काही गरुड मूर्ती एक गुडघा टेकवून बसलेल्या स्थितीत पण असतात, जिथे एका हातात सर्प तर दुसर्या हातात सस्त्र असते. ' गुरुमादाय उड्डीनः इति गरुड ' - म्हणजेच जड वस्तू उचलून उडणारा असा तो गरुड असे गरुडाचे वर्णन ...