सुधागडचे ऐतिहासिक महत्त्व सुधागड हा लोणावळा डोंगर रांगांमधील किल्ला रायगड जिल्ह्यातील पाली गावापासून फक्त १० किमीवर आहे. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर असून गड विस्ताराने फारच मोठा आहे. या प्राचीन गडाला भोरपगड असेही म्हणत असत. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणावळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची मूळ जडणघडण झाली असावी असा अंदाज असून या किल्ल्याने शिलाहार, यादव, बहमनी, मुघल अशा राजसत्ता पाहिल्या. व नंतर इ.स. १६४८ साली हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील झाला. शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले. नारो मुकुंद यांनी शिवरायांना सुधागडला हिंदवी स्वराज्याची राजधानी करावी असे सुचविले होते. मात्र महाराजांनी रायगडाची निवड करून सुधागडाच्या बांधकामासाठी पाच हजार होन देऊन किल्ला लढाऊ बनवला. त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता. महाराजांच्य...