स्थळ : जंगली महाराज रस्ता , शिवाजीनगर , पुणे शहर चित्र क्रमांक १ : श्री जंगली महाराज प्रवेशद्वार चित्र क्रमांक २ : श्री जंगली महाराज समाधी, ध्वजस्तंभ जंगलीमहाराज म्हटले की, ते पुण्याचेच अशीही एक सर्वसामान्य समजूत आहे. तीही चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही, कारण महाराजांचे वास्तव्य बराच काळ पुण्यातच होते आणि त्यांचे बरेचसे कार्यही पुण्यातच झाले आहे. जंगली महाराज हे अलीकडील काळातील संत असूनही त्यांच्या जीवनचरित्राचा फारसा तपशील जनसामान्यांना माहीत नव्हता. तो उपलब्ध करून घेण्यासाठी पुण्यातील चित्रकार डी. डी. रेगे यांनी जवळपास बारा वर्षे संशोधन करून बरीच माहिती गोळा केली. त्यासाठी ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध भागांत गेले, जंगलीमहाराजांच्या शिष्यप्रशिष्यांना भेटले, त्यांच्या घराण्यातील लोकांना भेटले, अनेक उर्दू, फार्सी, मोडी दस्तावेजांचा त्यांनी धांडोळा घेतला. सुप्रसिद्ध इतिहास-संशोधक डॉ. ग. ह. खरे यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासकांशी चर्चा केली. मंदिर परिसर : पुण्यनगरीत सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर हे एक पावन व अग्रगण्य स्थान आहे. जिमखान्यावरून निघा...