श्री विष्णु मंदिर, पर्वती ( पुणे ) श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी श्री विष्णु मंदिराचे बांधकाम देवदेवेश्वर मंदिराच्या वेळेसच केले आहे. या देवालयाची बांधणी फार प्रशस्त अशी आहे. ती एखाद्या मोठ्या खोलीसारखी आहे. श्री विष्णुची स्थापना ज्येष्ठ शुध्द १० शके १६८० दि. १३ जून १७५८ रोजी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली आहे. श्री विष्णुची साडेचार फूट उंचीची अतिभव्य पूर्णाकृती मूर्ती अत्यंत सुंदर आणि देखणी असून प्रथम दर्शनीच तिची छाप पडते. श्री विष्णुच्या अत्यंत देखण्या मूर्तीपैकी ही एक आहे. काजळासारख्या काळ्याशार अशा नेपाळमधील गंडकी नदीतील शालिग्राम शिलेची ही मूर्ती आहे. श्री विष्णुची चोवीस नावे संध्येमध्ये उच्चारली जातात. भारतीय मूर्तिशास्त्राने श्री विष्णुच्या चोवीस नामांवर आधारित असे चोवीस मूर्तिविग्रह केले आहेत , भगवान विष्णु , आपल्या चार हातामध्ये शंख , चक्र , गदा , पद्म या चार वस्तू कोणत्या क्रमाने धारण करतात , त्या क्रमावर हे फरक ठरवून दिलेले आहेत. हा क्रम उजवीकडील खालचा हात , वरचा हात , नंतर डावीकडील वरचा हात , खालचा हात , असा असतो , जेव्हा विष्णु मूर्ती ग ...