Skip to main content

Posts

Showing posts with the label Backwater

Vasota Fort / किल्ले वासोटा

अवर्णनीय वनदुर्ग, वासोटा   वासोटा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार वंशीय दुसऱ्या राजा भोजकडे जाते . प्रथमत: शिर्के व मोरे यांच्याकडे वासोट्याचा ताबा गेला . पुढे ६ जून , १६६० रोजी शिवरायानी वासोटा किल्ला जिंकला . राजापूर प्रकरणी पकडलेल्या राव्हग्टन व इतर इंग्रजाना शिवरायांनी या किल्ल्यावरच कैदेत ठेवले होते . पुढे २७ सप्टेंबर , १६७९ रोजी शिवरायांना या गडावरच गुप्तधनाने भरलेले ४ हंडे सापडले . इ.स. १७०० मध्ये औरंगजेबने सज्जनगडास वेढा घातल्यानंतर परशुराम प्रतिनिधींनी सज्जनगडावरील सर्व मौल्यवान मूर्ती वासोट्यावर आणून ठेवल्या होत्या . पुढे १७३० मध्ये औंधचे प्रतिनिधी व पेशवे यांच्यात तंटा निर्माण झाला . पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी पंतप्रतिनिधीचा पराभव केला . पण आपल्या धन्याचा पराभव सहन न होऊन ताई तेलीणीने वासोटा किल्ल्यावर जाऊन पेशव्याविरुध्द बंड पुकारले . तब्बल ८ - १० महिने झुंज देऊन बापू गोखल्यांनी वासोटा परत जिंकून घेतला . त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गंमतीचा उल्लेख येतो- "श्रीमंत प्रतिनिधींचा हा अजिंक्य किल्ला वासोटा । ताई तेली...