Skip to main content

Posts

Showing posts with the label सिन्नर

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर / Gondeshwar Temple, Sinnar

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर बाणासूर राक्षसाने सिन्नर नगरी उचलून पालथी केली, अशी अख्यायिका सिन्नरबाबत सांगितली जाते. सिंधीनगर उर्फ सेनुनापूर अन् ‌नंतर सिन्नर अशी अनेक नावं एखाद्या नक्षीदार शालीसारखे पांघरत या नगरीने मोठा प्रवास केला आहे. सेऊणचंद्राने 'सेऊणपुरा' या नावाने स्वतंत्र पेठ किंवा वस्ती निर्माण केली असे काही ताम्रपटात म्हटल्याचे दिसते. सिन्नरचा इतिहास जेवढा अनोखा आहे. तेवढीच तेथील मंदिरेही देखणी आहेत. सुमारे आठशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. हे एकटे मंदिर नसून, शिवपंचायतन स्वरूपात असणारा हा पाच मंदिरांचा समूह आहे. म्हणूनच गोंदेश्वराचे महत्त्व फक्त सिन्नर अथवा नाशिकपुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या स्थापत्यशिल्प वैभवात या मंदिराने भर घातलेली आहे. हे मंदिर पुरातन, भूमिज स्थापत्यशैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीच...