मंदिरे कसे ओळखायचे ? महाराष्ट्र मधील मंदिराच्या बाबतीत बहुतांश लोक गल्लत करतात. सर्व मंदिरांना हेमाडपंथी असं संबोधित करून त्याचे कालखंड, त्याचा इतिहास सर्व काही गाळून टाकतो. यादव सम्राट रामचंद्रदेव याचा हेमाद्री हा सेनापती "सकलकरणाधिप" म्हटला जाई. १२ व्या ते १४ व्या शतकापर्यंत ह्यांचा सुवर्णकाळ. त्याच्या काळाच्या अगोदरच्या शतकातील मंदिरे कशी बांधली असतील ? हा प्रश्न काही जनांना नक्कीच पडला पण याचे उत्तर मात्र कोणी शोधले नाही. त्याच्या अगोदर शिलाहार काळात ( ८ व्या ते १२ व्या), राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक यांच्या काळात उत्तम अशी घडीव मंदिरे बांधली गेली त्यांनाही लोक हेमाडपंथी म्हणून मोकळे होतात. त्या भागात कोणती सत्ता होती ? कोणत्या सत्तेची राजधानी किंवा त्याचा जवळ आहे का ? शिव आहे की वैष्णव ? मंग सत्ताधारी कोणते होते ? दानपत्र किंवा शिलालेख आहे का परिसरात ? हे सर्व लक्षात घेऊन कोणी अभ्यास करत नाही. दिसेल तिला हेमाडपंथी म्हणून मोकळे होतो. मुळात हेमाडपंथी ही मंदिराची शैली नाहीच. तिला आपण यादवकालीन म्हंटल पाहिजे. हेमाद्री हा कुशल सेनापती होता आणि मोठा धार्मिक ही हो...