Skip to main content

Posts

Showing posts with the label Samarbhoomi Umbarkhind

Samarbhumi Umbarkhind / समरभूमी उंबरखिंड

समरभूमी उंबरखिंड  शिवरायांनी लढलेल्या अनेक लढायांपैकी एक महत्वाची लढाई म्हणजे उंबरखिंडीची लढाई. खोपोली पाली रोडवर उंबर गावापासून पुढे उंबरखिंडीचा फाटा लागतो, या फाट्यापासून गाडीने ४ किमी आत गेल्यावर समरभूमी उंबरखिंड स्मारक आहे . इतिहास : इ.स. १६६१ च्या जानेवारीत शाहीस्तेखानाने कारतलबखानाला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहीमेवर पाठविले. कारतलबखानाबरोबर, कछप, जसवंत कोकाटे, जाधवराव हे सरदार व रायबाघन ही स्त्री सरदार होती. याशिवाय पायदळ व घोडदळ अंदाजे २०,०००, घोडे, बैल, छोट्या तोफा, बंदूका, डेरे, हत्ती, खजिना असा मोगली सरंजाम होता. खान पूणे, तळेगाव- वडगाव- मळवली मार्गे लोणावळ्याकडे सरकला वास्तविक पाहाता वाटेवरील लोहगड, विसापूर किल्ले स्वराज्यात होते, पण महाराजांच्या आज्ञेमुळे या किल्ल्यावरुन खानाच्या सैन्याला कोणताच विरोध झाला नाही. कारण उंबरखिंडीत खानाला कोंडीत पकडून झोडपून काढणे शक्य होते. महाराजांनी नेताजीला खानाच्या वाटेवरील पाणवठ्यांची, विहिरींची कोंडी करण्याचा हुकूम दिला. त्यामुळे खानाची फौज तहानेने हैराण झाली. खानाला उंबरखि...