Skip to main content

Posts

Showing posts with the label तुळजा लेणी

तुळजा लेणी, जुन्नर ( पुणे ) / Tulja Caves, Junnar ( Pune )

तुळजा लेणी, जुन्नर ( पुणे ) जुन्नर परिसरातील सर्वांत प्राचीन बौद्ध (थेरवाद) लेणी समूह. या लेणी जुन्नरच्या पश्चिमेस सुमारे ३.५ किमी. अंतरावर पाडळी गावाजवळील तुळजा टेकडीत खोदली आहेत. मध्ययुगात येथील लेणे क्र. ४ मध्ये तुळजाभवानीची मूर्ती स्थापन केल्याने या संपूर्ण टेकडीला ‘तुळजा टेकडी’ असे संबोधले जाऊ लागले. तुळजा लेणी उत्तराभिमुख असून त्यांत एकूण तेरा लेणी आहेत. यांपैकी लेणे क्र. ३ हे चैत्यगृह; तर उर्वरित विहार व इतर सामान्य खोल्या आहेत. त्यांतील बहुतेकांची प्रवेशद्वारे काळाच्या ओघात तुटलेली आहेत. यांशिवाय तीन अपूर्ण लेणी व दोन पाण्याची टाकी या लेणी समूहात खोदली आहेत. या लेण्यांत अद्यापि एकही शिलालेख आढळलेला नाही. लेणे क्र. १ सामान्य खोली आहे. लेणे क्र. २ एक विहार असून आत चौरस मंडप आहे. लेणे क्र. ३ हे एक वर्तुळाकार चैत्यगृह असून हे या समूहातील वैशिष्ट्यपूर्ण लेणे आहे. या लेण्याच्या मध्यभागी एक स्तूप आहे. स्तूपाचा खालील भाग गोलाकार असून त्यावर  ‘अंड’ आहे. अंडावर हर्मिका तसेच चौरस खाच होती, ती आता नष्ट झालेली आहे. स्तूपाच्या भोवती साधे बारा अष्टकोनी स्तंभ आहेत. ...