Skip to main content

Posts

Showing posts with the label Shri Lakshmi Narasimha Mandir

श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) / Shri Lakshmi Narasimha Mandir, Sadashiv Peth ( Pune )

श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) महाराष्ट्रात लक्ष्मीनृसिंहाची मंदिरं तशी थोडीच आहेत. त्यापैकी एक मंदिर आपल्या पुण्यातील सदाशिव पेठेत आहे. खुन्या मुरलीधर मंदिराकडून टिळक रस्त्याकडे जाताना, सध्याच्या पुणे विद्यार्थी गृहाच्या समोर एक जुन्या पद्धतीचा दगडी पायऱ्यांचा लाकडी दरवाजा दिसतो. आतल्या बाजूस असलेल्या श्री लक्ष्मीनृसिंह मंदिराचे ते प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये पेशवेकालीन मराठा शैलीतील लक्ष्मीनृसिंहाचे लहानसे मंदिर आहे. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत १७८८ मध्ये येथील नृसिंह मंदिराचे बांधकाम करण्यात आले. १८ व्या शतकात बांधलेल्या तुळशीबाग व बेलबाग या मंदिरांच्या धर्तीवर या मंदिराची रचना केलेली आहे. हे मंदिर चिरेबंदी असून मंदिराला सुंदर कळस, कोरीव छत व महिरपी असलेला लाकडी दिवाणखाना आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून आत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस पिंपळाचा भव्य पार आहे. या पारावर पेशवेकालीन हनुमानाची मूर्ती, नागदेवतेच्या शिळा व दगडात कोरलेल्या अज्ञात पादुका आहेत. या पारानजीक असलेल्या खोलीत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे...