तुळशीबाग श्री राम मंदिर, बुधवार पेठ ( पुणे ) पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणले जाते. या सांस्कृतिक राजधानीचे जे अलंकार आहेत त्यातील महत्वाचा एक म्हणजे तुळशीबाग. तुळशीबाग हे प्रसिद्ध व ऐतिहासिक ठिकाण. येथील रामाचे मंदिर व परिसर हे आजही अनेकांना कायम खुणावत असते. हे मंदिर बांधले नारो आप्पाजी तुळशीबागवाले यांनी. नारो आप्पाजी हे पेशवाईतले प्रसिद्ध व कर्तबगार व्यक्तिमत्व. त्यांचे मूळ आडनाव ' खिरे ' होते. यांचे वडील सातारा जिल्ह्यातील पाडळी गावाचे जोशी-कुलकर्णी. श्री रामदास समर्थांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या पाडळी येथे नारो आप्पाजी यांचा जन्म झाला. नारो अप्पाजींचे मूळ नाव नारायण असे होते व मुंज होईपर्यंत त्यांचे वास्तव्य पाडळी येथेच होते. त्यामुळे रामोपासनेचा वसा त्यांना लहान वयातच मिळाला असावा. एक दिवस नारो आप्पाजी आई वर रुसून पुण्याला आले व तिथेच त्यांची गोविंदराव खासगीवाले यांच्याशी गाठ पडली. त्यावेळी खासगीवाले यांनी लहानग्या नारायणास आश्रय दिला जिथे आता सद्य राम मंदिर आहे. त्या काळी या जागेत श्री खासगीवाले यांची तुळशीची बाग होती. तेथून लहानग्या नाराय...