Skip to main content

Posts

Showing posts with the label पर्वती

प्रश्न आहे पर्वतीवरील झोपडपट्टीचा

प्रश्न आहे पर्वतीवरील झोपडपट्टीचा पर्वतीचं सौंदर्य आणि आरोग्यपूर्ण वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरलेली झोपडपट्टी हटविण्यासाठी काही वर्षांपूर्वी त्या झोपड्यांच्या स्थलांतरासाठी बिबवेवाडीत नवी घरं उभारण्याची योजना आखली गेली. पुढे ही नवी घरकुलं उभी राहिली. पण पर्वतीवरील झोपड्या तशाच राहिल्या. अशा झोपडपट्ट्या म्हणजे निवडणुकीतील मतपेट्याच ठरतात, असा लोकप्रतिनिधींचा समज असल्यामुळे हे झोपडपट्यारूपी गलिच्छ वस्तीचं गालबोट दूर होऊ शकले नाही. आता तर ही वस्ती वाढतेच आहे. इतरही अनेक टेकड्यांवर त्याची कागद काच लागण झाली आहे. पर्वतीच्या उतारावरील कबुतरांच्या ढाबळी, पत्रा-पुठ्ठा-भंगार गोळा करणाऱ्यांची गोदामं यांनीही अधूनमधून बस्तान मांडण्याचा शिरस्ता ठेवला आहे. वनीकरण झालेल्या भागातील झाडांची चोरटी तोड, पर्वतीवर नेणाऱ्या प्रशस्त पायऱ्यांच्या दुतर्फा असलेले लोखंडी कठडे चोरीला जाणे अशा गोष्टी वारंवार घडताना दिसतात. पर्वतीचे डोंगरउतार श्रीदेवदेवेश्वर संस्थानच्या मालकीचे नाहीत. सरकारी वा खाजगी डोंगरउतारावर वसलेल्या नि वाढत जाणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या निर्मूलनासाठी ते कायदेशीर कार्यवाही करू शकत ना...

पेशवा वस्तुसंग्रहालय, पर्वती ( पुणे ) / Peshwa Museum, Parvati ( Pune )

पर्वतीवरील पेशवा वस्तुसंग्रहालय १९७५ मध्ये पुण्यातील प्रख्यात चित्रकार व कलाशिक्षक श्री जयंत खरे यांनी ऐतिहासिक पर्वतीवर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय असावे, अशी योजना मांडली. त्यावर श्रीदेवदेवेश्वर संस्थानच्या पदाधिकान्यांनी विचार विनिमय केला. श्री जयंतराव खरे यांनी या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही मान्य केले. तत्पूर्वी श्रीदेवदेवेश्वर मंदिराच्या शेजारीच काही शस्त्रे व वस्तू प्रदर्शित केल्या होत्या. या योजनेच्या प्रारंभी प्राकार भिंतीतील काही ओवऱ्या बंदिस्त असल्याने, त्यांचा उपयोग संग्रहालयाचे दालन म्हणून केला गेला. त्याला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे अधिक मोठ्या संग्रहालयाची कल्पना आणखी पुढे रेटली गोली. ५ जुलै १९८८ रोजी पेशवा संग्रहालयाचे रीतसर उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब ऊर्फ बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे यांच्या हस्ते पार पडले. त्यामध्ये जुनी शास्त्रे, पगड्या, जुने पोषाख, अनेकविध वस्तू , ऐतिहासिक व्यक्तींची तैलचित्रे, जुन्या पुण्याचे दर्शन घडविणारी चित्रे, ऐतिहासिक कागदपत्रे, इतिहासकाळातील व्यक्तींची हस्ताक्षरे व मुद्रा (ठसे) अशा वस्तूंचा समावेश झाला. या संग्रहालय...

श्री कार्तिकस्वामी मंदिर , पर्वती ( पुणे ) / Shri Kartikswami Temple , Parvati ( Pune )

श्रीकार्तिकस्वामी मंदिर , पर्वती  अटकेपार मराठी झेंडे नेणाऱ्या राघो भरारी म्हणजे राघोबादादा यांनी पर्वतीवर कार्तिकेयाचे मंदिर उभारले. परमप्रतापी बाजीराव पेशव्यांचे ते धाकटे चिरंजीव आणि पुण्याचे मोठ्या शहरात रूपांतर करणाऱ्या नानासाहेब पेशव्यांचे ते धाकटे बंधू. राघोबादादांचा कल थोडासा तंत्रमार्गाकडे होता. त्यांची दैनंदिन आचरणातील स्नानसंध्या - पूजाअर्चा - जपजाप्य , तांडव गणेशाची उपासना , विविध अनुष्ठाने पाहता , त्यांनी शिवपुत्र षडानन म्हणजे स्कंद किंवा कार्तिकेयाची मूर्ती स्वतंत्र देवालयात स्थापन केली. महाराष्ट्रात कार्तिकेयाची स्वतंत्र देवालये फारशी नाहीत. आपण जरी कार्तिकेयाला ब्रह्मचारी ( आणि स्त्रीद्वेष्टा ) समजत असलो आणि महाराष्ट्रात स्त्रियांनी कार्तिकेयाचं दर्शन न घेण्याची प्रथा असली , तरी दक्षिण हिंदुस्तानात सुब्रह्मण्यम किंवा मुरूगन म्हणून याच कार्तिकेयाच्या असंख्य मूर्ती व उपदेवालये किंवा देवळे आहेत. त्या षडाननाची उपासना , पूजा , दर्शन तेथील स्त्रिया नेहमी करत असतात. पर्वतीवरच ह्या कार्तिकेय मंदिराची उभारणी राघोबादादांनी करावी , हे मात्र त्यांच्या पत्नी आनंदीबा...

श्री विष्णु मंदिर, पर्वती ( पुणे ) / Shri Vishnu Temple, Parvati ( Pune )

श्री विष्णु मंदिर, पर्वती ( पुणे )   श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी श्री विष्णु मंदिराचे बांधकाम देवदेवेश्वर मंदिराच्या वेळेसच केले आहे. या देवालयाची बांधणी फार प्रशस्त अशी आहे. ती एखाद्या मोठ्या खोलीसारखी आहे. श्री विष्णुची स्थापना ज्येष्ठ शुध्द १० शके १६८० दि. १३ जून १७५८ रोजी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली आहे. श्री विष्णुची साडेचार फूट उंचीची अतिभव्य पूर्णाकृती मूर्ती अत्यंत सुंदर आणि देखणी असून प्रथम दर्शनीच तिची छाप पडते. श्री विष्णुच्या अत्यंत देखण्या मूर्तीपैकी ही एक आहे. काजळासारख्या काळ्याशार अशा नेपाळमधील गंडकी नदीतील शालिग्राम शिलेची ही मूर्ती आहे. श्री विष्णुची चोवीस नावे संध्येमध्ये उच्चारली जातात. भारतीय मूर्तिशास्त्राने श्री विष्णुच्या चोवीस नामांवर आधारित असे चोवीस मूर्तिविग्रह केले आहेत , भगवान विष्णु , आपल्या चार हातामध्ये शंख , चक्र , गदा , पद्म या चार वस्तू कोणत्या क्रमाने धारण करतात , त्या क्रमावर हे फरक ठरवून दिलेले आहेत. हा क्रम उजवीकडील खालचा हात , वरचा हात , नंतर डावीकडील वरचा हात , खालचा हात , असा असतो , जेव्हा विष्णु मूर्ती ग ...