Skip to main content

Posts

Showing posts with the label प्राचीन पुणे

प्राचीन पुणे / Ancient Pune

प्राचीन पुणे   आपण राहतो ते गाव किती जुने आहे हे प्रत्येक गावकऱ्याने माहिती करून घेतलेच पाहिजे , कारण त्या गावाचा वारसा आपण पिढ्यान्पिढ्या जपतो. जसे एखाद्या देवळात गेल्यावर क्षेत्रमाहात्म्य सांगितले जाते आणि ते आपण भक्तिभावाने ऐकतो , तसेच आपले गाव हे आपल्याच नव्हे , तर आपल्या पूर्वजांचेही कार्यक्षेत्रच. त्या क्षेत्राचा महिमा , त्याचे महत्त्व आणि माहात्म्य आपणालाच माहिती नसेल तर येणाऱ्या पिढ्यांना काय समजणार. म्हणूनच ज्या पुण्यात आपण राहतो , त्या पुण्याची , पुण्याच्या इतिहासाची थोडी माहिती करून घेणे आवश्यक आहे . त्रिखंडात गाजलेले पुणे , जरी पेशव्यांच्या काळापासून भरभराटीला आले असले , तरी पुण्याला प्राचीन इतिहासाचे अधिष्ठान आहे . या इतिहासाची पूर्वपीठिका अगदी प्राचीन काळापासून म्हणजे अश्मयुगापासून आहे. काही वर्षांपूर्वी डेक्कन कॉलेजच्या परिसरात नदीच्या पात्रात अश्मयुगीन दगडी हत्यारे सापडली , तेव्हा पुण्यात आदिमानवांची वस्ती असावी असा तर्क गृहीत धरून शोध घेण्यास सुरुवात झाली . पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवरील कोरेगावातही अश्मयुगीन हत्यारे व साधने सापडली. काळ्...