Skip to main content

Posts

Showing posts with the label कोयाजी बांदल

वीर कोयाजी बांदल यांची समाधी, भोर / Samadhi Of Veer Koyaji Bandal

वीर कोयाजी बांदल समाधिस्थळ  नेकलेस पॉईंट पासुन हाकेच्या अंतरांवर मुख्य वाटेपासुन आडबाजूला झाडीत स्वराज्य स्थापनेच्या उभारणीसाठी झटलेल्या अगणित वीर योद्धांपैकी एक योद्धा विसावलाय. स्वराज्यातील मानाच्या तलवारीच्या पहिल्या पात्याचा मान मिळवलेलं बांदल घराणं. शाहिस्तेखानाच संकट स्वराज्यावर येऊन धडकले होते.याच शाहिस्तेखानाला मातित गाडण्यासाठी बारा मावळची ४०० रनमर्दानची फौज तयार केली.याच फौजेत "हिरडस मावळचे कोयाजीराजे नाईक-बांदल" हे ही होते. या लढाई मध्ये शाहिस्तेखानाची पळता भुई करुन सोडल होत. या लढाईत पराक्रमांची शर्त लढवत असताना कोयाजीराजे नाईक-बांदल धारातिर्थ पडले. नेकलेस पॉइंट पासुन थोड्याच अंतरांवर या योद्ध्याचे समाधिस्थळ आहे. पण ना तिथे कोणती पाटी आहे ना कोणती माहिती त्यामुळे तिकडे फारसं कोणी फिरकत ही नाही. आपल्यासारख्या भटक्यांची पावलं कधी पडतील याच प्रतिक्षेत हे स्थळ आजही वाट पहात आहे. जेव्हा केव्हा तुम्ही इथून जाल तेव्हा नतमस्तक व्हायला विसरु नका अन जमलंच तर एखादं रानफुल ही अर्पण करायला विसरु नका. 🍁