Skip to main content

Posts

Showing posts with the label Menavali

नाना फडणवीस वाडा ( मेणवली वाडा ), मेणवली ( वाई ) / Nana Fadnavis Wada ( Menavali Wada ), Menavali ( Wai )

नाना फडणवीस वाडा ( मेणवली वाडा ) वाई पासून जवळ ३.५ किमी अंतरावर मेणवली गाव वसले आहे. इथेच नाना फडणवीस वाडा ( मेणवली वाडा ) हा राजमान्य राजश्री नाना फडणवीसांनी १७७० च्या दशकात बांधला. याबरोबर त्यांनी वाड्याच्या पाठी कृष्णा काठी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधल. इथेच महादेवाचे आणि विष्णूचे (मेणवलेश्वर) मंदिर बांधले. मेणवलेश्वर आणि वाड्याच्या भिंती भित्तिचित्रांनी अलंकृत केले. मेणवली हे गाव भगवंतराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी आणि रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नाना फडणवीसांना इनाम मिळाले होते. हा वाडा जवळपास ३४६०२ चौरस फूट इतक्या जागेवर पसरलेला आहे. दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून तीन दिशांना बुरुज आहेत. वाड्याच्या उत्तर पश्चिम आणि दक्षिण अशा तीन दिशांना प्रवेशद्वारे आहेत. वाड्याच्या पूर्व बाजूने मुख्य प्रवेश आहे आणि त्याचा दरवाजा उत्तराभिमुख आहे. इथेच नगारखाना आहे. वाड्याच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वार वाड्याच्या मागच्या बाजूला नदीघाटावर उघडते. वाड्यात एकूण ६ चौक आणि जवळपास २०० लहानमोठे खन आहेत. बांधकाम करताना काळ्या पाषाणातले भक्कम जोते उभारून ...