Skip to main content

Posts

Showing posts with the label गडकिल्ले

सुधागड / Sudhagad

सुधागडचे ऐतिहासिक महत्त्व सुधागड हा लोणावळा डोंगर रांगांमधील किल्ला रायगड जिल्ह्यातील पाली गावापासून फक्त १० किमीवर आहे. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर असून गड विस्ताराने फारच मोठा आहे. या प्राचीन गडाला भोरपगड असेही म्हणत असत. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणावळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची मूळ जडणघडण झाली असावी असा अंदाज असून या किल्ल्याने शिलाहार, यादव, बहमनी, मुघल अशा राजसत्ता पाहिल्या. व नंतर इ.स. १६४८ साली हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील झाला. शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले. नारो मुकुंद यांनी शिवरायांना सुधागडला हिंदवी स्वराज्याची राजधानी करावी असे सुचविले होते. मात्र महाराजांनी रायगडाची निवड करून सुधागडाच्या बांधकामासाठी पाच हजार होन देऊन किल्ला लढाऊ बनवला. त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता. महाराजांच्य...

दिवाळीत लहान मुलं एकत्र जमून किल्ला का बनवतात ?

दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, शाळेला सुट्टी, नवीन कपडे आणि किल्ला या सार्‍या गोष्टी आठवतात ना तुम्हाला. पण तुम्हाला माहितेय का ? दिवाळीत लहान मुलं एकत्र जमून किल्ला का बनवतात ? कदाचित मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत. लहानपणी किल्ला करताना हे सारे प्रश्न पडायचे. पण उत्तर मात्र मोठे होताना सापडलं. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे. आपल्या महाराष्ट्रातील किल्ले, गड या सार्‍यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा आपला भारत, आपला महाराष्ट्र गुलामगिरीत जगत होता , सुराज्य हे फक्त स्वप्न बनून राहिले होते तिथे कसले आले सण आणि कसला उत्साह. हा उत्साह , विश्वास देण्याच काम केल स्वराज्याने. शिवछत्रपतींनी उभ्या केलेल्या स्वराज्यात स्वातंत्र्य होत. लोकांना सुरक्षितता होती आणि शोषण थांबल होत. लोक खरोखर सुराज्य , रयतेच राज्य स्वप्नाच्या जगातून प्रत्यक्षात उतरलेलं बघत होते. त्यानंतरच दिवाळीला खरा अर्थ प्राप्त झाला . स्वाभिमान जागृत झालेली मानस आता गुलामीतून बाहेर...

गड व त्यांचे प्रकार.

प्रकार – गडाचे प्रामुख्याने गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भूदुर्ग, असे प्रकार पडतात. 1) भुदुर्ग – नावाप्रमाणेच ,सपाट जमिनीवर, मोकळ्या जागेत, तटबंदी, खंदक इ गोष्टींनी वेढलेला गड भुईकोट या प्रकारात मोडतो. उदा : चाकण ,परांडा ,नळदुर्ग इ. 2) गिरीदुर्ग – उंच डोगरांगामध्ये एखाद्या डोंगराच्या, पर्वताच्या शिखरावर, माथ्यावर बांधलेला गड म्हणजे गिरीदुर्ग होय. उदा: रायगड, तोरणा, राजगड इ. 3) जलदुर्ग – पुर्णपणे पाण्याने वेढलेल्या खडकावर, बेटावर, समुद्रात पाण्यामध्ये बांधलेला तटबंदीयुक्त किल्ला म्हणजे जलदुर्ग होय. उदा : सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, जंजिरा इ. 4) वनदुर्ग – घनदाट अरण्याने, झाडीने वेढलेले दुर्गम गड वनदुर्ग या प्रकारात मोडतात. उदा: वासोटा. 5) जोडकिल्ले – एकाच डोंगरावर,वेगवेगळ्या शिखरावर,जवळपास असलेले गड जोडकिल्ले म्हणून ओळखतात. उदाः पुरंदर -वज्रगड, चंदन-वंदन. यासंदर्भात आज्ञापत्रात उल्लेख सापडतो. “एका गडासमीप दुसरा पर्वत,किल्ला असू नये, असल्यास तो सुरूंग लावून गडाचे आहारी आणावा, जर शक्य नसेल तर बांधून ती जागा मजबूत करावी.“ 6) गडाची तटबंदी – कोणत्याही गडाची तटबंदी म्हणजे एकप्रकारे गडाचे चिलख...