Skip to main content

Posts

Showing posts with the label Satara

सातारा इतिहास / History Of Satara

सातारा ऎतिहासिक संदर्भ : सातारा मराठा साम्राज्याची राज्‍याची राजधानी होती. त्‍याचा विस्‍तार सुमारे १४ लक्ष कि.मी. इतका होता. या भुमीला सांस्‍कृतीक वारसा लाभलेला आहे. जिल्‍हयातील कित्‍येक थोर योध्‍दे, राजे, संत आणि थोर व्‍यक्तिमत्‍वांनी महाराष्‍ट्राचा इतिहास घडवला आहे. ई.स. पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे. दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते. हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे ‘चालुक्य‘ , ’राष्ट्रकुट‘, ’शिलाहार‘, देवगिरीचे यादव , ’बहामनी‘ व ‘आदिल शहा‘, (मुस्लिम राज्यकर्ते), ’शिवाजी महाराज‘ (मराठी राज्यकर्ते ), ‘शाहू महाराज ‘, आणि ‘शाहू-२ प्रतापसिंह‘ यांनी राज्य केले. मुस्लिम राज्‍यकर्त्‍यांनी ई.स. १२९६ मध्‍ये प्रथम जिल्‍हयावर आक्रमण केले. सन १७०७ पर्यंत मुस्लिमांचे अधिपत्‍य होते. सन १६३६ साली निजामशाहीचा ...

कास पठार, सातारा / Kaas Plateau, Satara

कास पठार   पश्चिम घाटाची ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळख असलेले कास पठार हे सातारा शहरापासून २५ किमी वर आहे. कास पठारावर जून ते ऑक्टोबर या कालावधीत फुले येतात. सतत बदलते हवामान आणि तापमान यांमुळे येथे फुलणारी फुले आकाराने लहान असतात. त्यांच्या पुनरुत्पादनाची शक्यता जास्तीत जास्त असावी, यासाठी फुलांमध्ये कोट्यवधी परागकणांची निर्मिती होत असते. त्यामुळे एका वेळेस एका जातीची अगणित फुले फुलतात आणि फुलांचा एकाच रंगाचा गालिचा पसरल्यासारखा दिसतो. कास पठारावर आठशेपेक्षा जास्त वनस्पती प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यांपैकी ४७ प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेच्या (यूनेस्कोच्या) पथकाने ऑक्टोबर २०१० मध्ये कास पुष्प पठाराला भेट दिली होती. येथील अलौकिक जैवविविधता पाहून या परिसराला ‘जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा (World Natural Heritage Site) चा दर्जा बहाल करण्यात आला. या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वन खात्याने व निसर्गप्रेमी स्वयंसेवी संस्थांनी विविध उपाय योजले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कुंपण घालण्यात ...

अदालतवाडा ( अदालत राजवाडा ), सातारा / Adalatwada ( Adalat Rajwada ), Satara

अदालतवाडा ( अदालत राजवाडा ) छत्रपती संभाजीमहाराजांनंतर राजाराममहाराजांना जिंजीस जावे लागले व महाराणी येसूबाई यांना आपले नऊ वर्षांचे पुत्र शाहूराजे यांच्यासह औरंगजेबाची कैद पत्करावी लागली. पुढे सन १६९९ मध्ये ( जून ) राजाराममहाराज साताऱ्यास आले व त्यांनी आपली नवी राजधानी सातारा झाल्याचे जाहीर केले. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूराजे कैदेतून सुटले ( सन १७०८ ) व साताऱ्यास येऊन सातारा येथे आपला राज्याभिषेक केला. सातारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा हे लहानसे खेडे होते. राजधानीचे ठिकाण झाल्यावर शाहूराजांनी त्याचा विकास केला. त्याच वेळी त्याचे नामकरण शाहूनगर असे करून तेथे काही वाडे बांधले. त्यांपैकी अदालतवाडा व इतर काही वास्तूंचे अवशेष आज साताऱ्यात पाहावयास मिळतात. सातारा किल्ल्याच्या माचीला अदालतवाडा ही वास्तू आजही मोठ्या दिमाखाने उभी आहे. छत्रपती शाहूमहाराजांनी आपले प्रशासन जेव्हा साताऱ्यात सुरू केले, तेव्हा न्यायनिवाडे करण्यासाठी व इतर शासकीय कामांसाठी हा वाडा बांधण्यात आला. १० फूट उंचीच्या जोत्यांवर उभा असलेला ६७ मीटर लांब व ४८ मीटर रुंद असा हा वाडा जवळजवळ ३०० वर्षे अभेद्य ...

श्री केदारेश्वर मंदिर, शिरवळ ( जि. सातारा ) / Shri Kedareshwar Temple, Shirwal ( Dist. Satara )

श्री केदारेश्वर मंदिर, शिरवळ ( जि. सातारा ) शिरवळ मध्ये प्राचीन काळात बांधलेले हे सुंदर मंदिर. पुणे-सातारा मुख्य हायावे पासून अगदी जवळ आहे. मंदिरासमोर पुष्करणी तलाव आहे. हा तलाव शापित आहे, असं एक दंतकथा सुद्धा आहे. १५ फूट तटबंदी असलेल्या मंदिराच्या मुख्य दरवाजामधून आत प्रवेश केला असता अगदी समोर नंदी सभामंडप आहे. डावीकडे उंच अष्टकोनी रेखीव दिपमाळ लक्ष वेधून घेते. शेजारी विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि तुळशी वृंदावन आहे. उजव्या बाजूला मारुती मंदिर आणि तुळशी वृंदावन आहे. मुख्य कमानीच्या आतील बाजूस श्री गणेश आणि रिद्धी सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या दगडी बांधकामावर आता रंगकाम झाले आहे. मंदिराची डागडुजी वेळेवर होते. मध्यभागी मोठी घंटा बसवली गेली आहे. बाहेरच्या सभामंडपात लाकडी खांबांनी आधार देऊन त्याला सुशोभित करण्यात आलेय. मध्य सभामंडपामध्ये दगडी खांब खूप सुंदर आहेत. आतील गर्भगृहामध्ये शिवपिंड विराजमान आहे. या मंदिराच्या आवारात आणि मंदिराच्या शिखरावर बरेच शिल्पकाम झालेय. यामध्ये श्री शेषशायी विष्णू , शिवशंकर पार्वती , गरुडदेव आणि देवदेवता यांच्या मूर्ती नंदी मंडपाच्या शिखरावर आह...

धोम धरण, धोम ( सातारा ) / Dhom Dam, Dhom ( Satara )

धोम धरण, धोम (सातारा  ) महाबळेश्वर येथूनच कोयनेच्या बरोबरीने उगम पावलेली कृष्णा नदी पूर्वेकडे दरीत झेपावते आणि वाईच्या दिशेने मार्गक्रमण करते. या वाईजवळ धौम्य ऋषींच्या आश्रमामुळे प्रसिद्ध पावलेल्या धोम गावाजवळ धोम धरण बांधलेले आहे. सन १९७८ मध्ये हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे कृष्णेवरील पहिले धरण होय. या धरणाची पाणी साठवण क्षमता १४ टीएमसी असून या धरणातील पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. वाई , सातारा , जावळी , कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यांना या सिंचनाचा लाभ होतो. यावर ४ मेगावॅट क्षमतेचा जल उर्जा प्रकल्प आहे. हे धरण सातारा शहरापासून ४४ कि.मी. (वाई पासून ९ कि.मी.) अंतरावर आहे. बोट क्लबची सुविधा येथे उपलब्ध असून पांचगणी येथील टेबल लँड वरून सुद्धा बोट क्लब व बोटिंगची  दृश्ये पहावयास मिळतात. मत्स्य संवर्धनाची कामे या ठिकाणी चालतात. धोम येथील श्री नरसिंहांचे मंदिर व सिद्धेश्वर मंदिर पाहण्याजोगे आहे. Instagram ID : @travelwala.chora

ढोल्या गणपती ( महागणपती ), वाई / Dholya Ganpati ( Mahaganpati ), Waai

ढोल्या गणपती ( महागणपती ), वाई   सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणरे ‘ढोल्या गणपती’चे मंदिर हे सर्व आबालवृद्ध गणेशभक्तांचे आवडते स्थान आहे. दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात. वाईकरांसाठी तर हा आध्यात्मिक ठेवा आहे. गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला ‘ढोल्या गणपती’ असे परिचित नाव आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले आहे. मंदिराचे विधान चतुरस्र असून, वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होते व मंदिर सुरक्षित राहते. गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची रेखीव बैठी एक मीटर ८० सेमी उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. तिची स्थापना वैशाख शु. १३ शके १६९१ ला करण्यात आली. मूर्तीचे स्वरूप बाळसेदार असल्याने कदाचित त्याला ‘ढोल्या गणपती’ ...

Vasota Fort / किल्ले वासोटा

अवर्णनीय वनदुर्ग, वासोटा   वासोटा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार वंशीय दुसऱ्या राजा भोजकडे जाते . प्रथमत: शिर्के व मोरे यांच्याकडे वासोट्याचा ताबा गेला . पुढे ६ जून , १६६० रोजी शिवरायानी वासोटा किल्ला जिंकला . राजापूर प्रकरणी पकडलेल्या राव्हग्टन व इतर इंग्रजाना शिवरायांनी या किल्ल्यावरच कैदेत ठेवले होते . पुढे २७ सप्टेंबर , १६७९ रोजी शिवरायांना या गडावरच गुप्तधनाने भरलेले ४ हंडे सापडले . इ.स. १७०० मध्ये औरंगजेबने सज्जनगडास वेढा घातल्यानंतर परशुराम प्रतिनिधींनी सज्जनगडावरील सर्व मौल्यवान मूर्ती वासोट्यावर आणून ठेवल्या होत्या . पुढे १७३० मध्ये औंधचे प्रतिनिधी व पेशवे यांच्यात तंटा निर्माण झाला . पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी पंतप्रतिनिधीचा पराभव केला . पण आपल्या धन्याचा पराभव सहन न होऊन ताई तेलीणीने वासोटा किल्ल्यावर जाऊन पेशव्याविरुध्द बंड पुकारले . तब्बल ८ - १० महिने झुंज देऊन बापू गोखल्यांनी वासोटा परत जिंकून घेतला . त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गंमतीचा उल्लेख येतो- "श्रीमंत प्रतिनिधींचा हा अजिंक्य किल्ला वासोटा । ताई तेली...