पर्वतीवरील पेशवा वस्तुसंग्रहालय १९७५ मध्ये पुण्यातील प्रख्यात चित्रकार व कलाशिक्षक श्री जयंत खरे यांनी ऐतिहासिक पर्वतीवर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय असावे, अशी योजना मांडली. त्यावर श्रीदेवदेवेश्वर संस्थानच्या पदाधिकान्यांनी विचार विनिमय केला. श्री जयंतराव खरे यांनी या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही मान्य केले. तत्पूर्वी श्रीदेवदेवेश्वर मंदिराच्या शेजारीच काही शस्त्रे व वस्तू प्रदर्शित केल्या होत्या. या योजनेच्या प्रारंभी प्राकार भिंतीतील काही ओवऱ्या बंदिस्त असल्याने, त्यांचा उपयोग संग्रहालयाचे दालन म्हणून केला गेला. त्याला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे अधिक मोठ्या संग्रहालयाची कल्पना आणखी पुढे रेटली गोली. ५ जुलै १९८८ रोजी पेशवा संग्रहालयाचे रीतसर उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब ऊर्फ बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे यांच्या हस्ते पार पडले. त्यामध्ये जुनी शास्त्रे, पगड्या, जुने पोषाख, अनेकविध वस्तू , ऐतिहासिक व्यक्तींची तैलचित्रे, जुन्या पुण्याचे दर्शन घडविणारी चित्रे, ऐतिहासिक कागदपत्रे, इतिहासकाळातील व्यक्तींची हस्ताक्षरे व मुद्रा (ठसे) अशा वस्तूंचा समावेश झाला. या संग्रहालय...