श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि श्री संत लिंबराज महाराज ( फुरसुंगीकर ) यांची समाधी, श्री क्षेत्र फुरसुंगी - पुणे १६ व्या शतकात फुरसुंगी येथील हरपळे घराण्यात श्री संत लिंबराज महाराज या थोर युगपुरूषाचा जन्म झाला. संपूर्ण आयुष्य विठ्ठल नामास अर्पण केल्यानंतर त्यांनी अखेर आपल्या या जन्म गावीच चैत्र शुद्ध तृतीयेस संजीवन समाधिष्ठीत होवून आपल्या कार्याची सांगता केली. अशा या थोर महात्म्याच्या हातून या विठ्ठल-रुख्मीणी मंदिराची स्थापना झाली. श्री संत तुकाराम महाराज यांच्याशी अनेकदा किर्तन प्रवचनाच्या निमित्ताने त्यांचे संबंध आले. तेव्हापासून ते आताच्या या चालु पिढीपर्यंत या घराण्यात वारकरी संप्रदाय परंपरेने चालत आला. या घराण्यात चालत आलेल्या अनेक थोर पुरूषांनी ग्रंथ निर्मितीचे कार्यही केले. संशोधन खात्यात त्यातील काही " भक्तप्रताप " सारखे ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. तर काही काळाच्या ओघात नाहीसेही झाले आहेत. सन १७७२ साली या घराण्यातील चौथ्या पिढीतील वंशजाचा नानासाहेब पेशवे यांचेकडुन मोत्याचा कंठा व मोहरा देवून सत्कार करण्यात आला. याच घराण्यातील सातव्या पिढीत वै.ह.भ.प.विठ्ठल महा...