Skip to main content

Posts

Showing posts with the label Shiva Kashid

Veer Mavala - Shiva Kashid / वीर मावळा - शिवा काशीद

वीर मावळा - शिवा काशीद शिवा काशीद हे शिवाजी राज्यांच्या सैन्यात न्हावी होते . त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले , म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले. हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजीराजांसारखे दिसत असत . त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा दिला होता . त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनीपालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशीदांना , शिवाजी राजे समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले . मात्र , हे शिवाजी नाहीत असे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खूपसली . ही घटना १२ - १३ जुलै १६६० या दिवशीघडली . या शिवा काशीद नावाच्या मर्द मावळ्याची दुरवस्थेतील समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी , विशाळगडाकडे जाणाऱ्या वाटेतील एका गावापाशी आहे . नेबापूरच्या ( चव्हाण ) " पाटलांनी " शिवा काशिदांना प्रति शिवाजी महाराज बनण्याची कल्पना दिली होती . ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नेबापूर ( चव्हाण ) पाटील आणि शिवा काशीद यांनी शिवाज...