पंत सचिवांचा वाडा ( शिरवळ , ता.खंडाळा ,जि.सातारा) पुणे-सातारा महामार्गावर नीरा नदीच्या काठावर वसलेले ऐतिहासिक असे शिरवळ हे गाव. स्वराज्याची पहिली लढाई म्हणून ओळख असणारे हे ऐतिहासिक गाव .याच गावात असणारा हा पंत सचिवांचा भव्य वाडा. पुण्यापासून अवघ्या 60 किमी अंतरावर आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सचिव पदावर शंकराजी नारायण होते , यांच्या पुढील पिढीत भोर संस्थान निर्माण झाले. या संस्थानातील शिरवळ विभागाची प्रशासकीय कचेरी शिरवळ येथे होती. त्यासाठी भोरकरांनी हा भव्य वाडा बांधला. सुमारे १३० वर्षापूर्वीचा हा वाडा आजही पंतसचिव घराण्याच्या इतिहासाची साक्ष देतो आहे. केदारेश्वर मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर पूर्वाभिमुखी उभ्या असलेल्या वाड्याच्या सागवानी महादरवाजा त्यावरील सुबक विटकाम आपलं लक्ष वेधून घेते. या वाड्यास एकूण दोन चौक आहेत. दरवाजातून आत आल्यावर पहिल्या चौकात समोरच भक्कम लोखंडी गजांची दारे असलेल्या खोल्या दिसतात, तसेच उजव्या हाताला लाकडी जिना त्यावर पत्र्याचे छप्पर आपणास बघावयास मिळते. जिना चढून गेल्यावर आपणास दोन सोपे दिसतात. पाहिल्या चौ