श्री क्षेत्र हरिहरेश्वर, श्रीवर्धन ( जिल्हा - रायगड ) / Shree Kshetra Harihareshwar, Shrivardhan ( District - Raigad )
श्री क्षेत्र हरिहरेश्वर, श्रीवर्धन ( जिल्हा - रायगड ) ऐतिहासिक माहिती श्रीमंत पेशवे ( भट घराणे ) यांचे श्री हरिहरेश्वर कुलदैवत होते. त्यामुळे अर्थातच श्रद्धा स्थान होते. पूर्वीच्या इतिहासकारांचे म्हणण्यानुसार सन १७२३ मध्ये श्रीमंत पेशव्यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. तीर्थावरील प्रदक्षिणेसाठीच्या मुळच्या पायऱ्या जावळीचे सुभेदार चंद्रराव मोरे यांनी बांधल्या. जीर्णोद्धाराचा उल्लेख आजमितीस श्रीकालभैरव मंदिर प्रवेशद्वारावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज देखील येथे दर्शनास येत असत. शेवटचे दर्शन महाराजांचे सन १६७४ साली झाल्याचा उल्लेख आहे. त्यावेळच्या उल्लेखातील एक महत्त्वाचा उल्लेख करावा असे वाटते. सन १७५६ मध्ये इंग्रज व पेशवे यांच्यात तह झाला. त्यावेळी इंग्रजीनी श्री हरिहरेश्वरची मागणी केली. परंतु रामाजीपंत किल्लेदार यांनी ठणकावून सांगितले की, हिंदू जनता आपली मुंडकी देईल परंतु हरिहरेश्वर देणार नाही. या विरोधामुळे अखेर हरिहरेश्वर क्षेत्र कारभाराचे दृष्टीने जंजिरा संस्थानकडे गेले. देवाला नवस बोलायची प्रथा फार पूर्वीपासूनच आहे. श्रीमंत पेशवे पोटदुखीने आजारी असताना देव