मारुती ( हनुमान ) म्हणजेच शक्ती, भक्ती आणि धैर्याचे प्रतीक. विविध रूपांमध्ये हनुमानाचे कार्य आणि त्याचे महत्त्व लक्षात घेतल्यास, त्याचे प्रत्येक रूप वेगळे आणि महत्त्वपूर्ण आहे असे जाणवते. हनुमानाचे काही विशेष रूपे आणि त्यांचे महत्त्व आज आपण जाणून घेऊया. मारुतीचे अर्थात हनुमंताच्या मूर्तीचे एकूण दहा प्रकार आहेत. १) चपेटदान मारुती २) वीर मारुती ३) दास मारुती ४) प्रताप मारुती ६) मिश्र मूर्ती ७) योगी मारुती ८) वार्ताहर मारुती ९) वीणा पुस्तकधारी मारुती १०) पंचमुखी मारुती १. चपेटदान मारुती हनुमानाने अशोकवाटिकेच्या विध्वंसासाठी राक्षस स्त्रियांना पराभूत करताना आपले शरीर आकारमान बदलले होते. त्याच्या हातात एक मोठा वृक्ष असतो, आणि त्याच्या उजव्या हातात चापट मारण्याचा आविर्भाव असतो, म्हणून याला 'कानफाडया मारुती' असेही म्हटले जाते. २. वीर मारुती यामध्ये हनुमान वीरासनात बसलेला असतो, ज्याच्या डाव्या हातात गदा असते आणि उजवा हात हा अभयमुद्रेत असतो. वीरमारुतीची शेपटी वर उभारलेली असते तर कधी कधी पायाखाली दैत्य असतो. ह्या रूपात हनुमान युद्धाच्या तयारीत दिसतो. ३. दास मारुती हनुमान अयोध्यापती रामच...