पर्वतीवरील पेशवा वस्तुसंग्रहालय
१९७५ मध्ये पुण्यातील प्रख्यात चित्रकार व कलाशिक्षक श्री जयंत खरे यांनी ऐतिहासिक पर्वतीवर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय असावे, अशी योजना मांडली. त्यावर श्रीदेवदेवेश्वर संस्थानच्या पदाधिकान्यांनी विचार विनिमय केला. श्री जयंतराव खरे यांनी या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही मान्य केले.
तत्पूर्वी श्रीदेवदेवेश्वर मंदिराच्या शेजारीच काही शस्त्रे व वस्तू प्रदर्शित केल्या होत्या. या योजनेच्या प्रारंभी प्राकार भिंतीतील काही ओवऱ्या बंदिस्त असल्याने, त्यांचा उपयोग संग्रहालयाचे दालन म्हणून केला गेला. त्याला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे अधिक मोठ्या संग्रहालयाची कल्पना आणखी पुढे रेटली गोली.
५ जुलै १९८८ रोजी पेशवा संग्रहालयाचे रीतसर उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब ऊर्फ बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे यांच्या हस्ते पार पडले. त्यामध्ये जुनी शास्त्रे, पगड्या, जुने पोषाख, अनेकविध वस्तू , ऐतिहासिक व्यक्तींची तैलचित्रे, जुन्या पुण्याचे दर्शन घडविणारी चित्रे, ऐतिहासिक कागदपत्रे, इतिहासकाळातील व्यक्तींची हस्ताक्षरे व मुद्रा (ठसे) अशा वस्तूंचा समावेश झाला.
या संग्रहालयासाठी नवी भव्य वास्तू उभारली गेली. बाह्यदर्शनी ती वास्तू जरी आधुनिक बांधकामाची वाटली, तरी अंतरदर्शन मात्र खास पेशवाई थाटाचे आहे. महिरपी कमानीच्या खिडक्या, सुरुदार खांब, जुन्या धाटणीची तक्तपोशी. हंड्या-झुंबरे, दिवे, मेणे, पालख्या, भांडी, मूर्ती, तोफांचे-गोळे, ठासणीच्या बंदुका, रेजगाऱ्या, छोटी तोफ, हत्तीवरील अंबारी, दहा हजारांहून अधिक नाण्यांचा संग्रह, पुण्याबद्दल शाहिरांची फलक, पेशवेकालीन बागांची माहिती, ऐतिहासिक वास्तूंची प्रकाशचित्रे (फोटो), जुन्या प्रख्यात विशंच्या प्रतिकृती, हस्तलिखिते, अनेक प्रकारची जुनी कुलुपे व किल्ल्या, पितळी देवतामूती, अनेक दाग-दागिने व त्यांच्या प्रतिकृती, वेगवेगळे ध्वज, अशा वैविध्याने हे संग्रहालय सुसज्ज झाले आहे.

श्री शिवछत्रपती, श्री शाहू छत्रपती, सात पेशवे, पेशवा परिवारातील काही व्यक्ती, शिंदे-होळकर-फडके-पटवर्धन आदी कर्तबगार सरदार घराण्यातील व्यक्ती ह्यांची एकाच आकाराची, मूळ चित्रांबरहुकूम अशी तब्बल चाळीस चित्रे या संग्रहालयाची शोभा व उपयुक्तता वाढवीत आहेत. १८५७ चा शिरोमणी ठरलेल्या सेनापती तात्या टोपे यांचे चित्र तर आहेच, पण बिठूरच्या पेशव्यांच्या भव्य पण भग्न राजवाड्याचे चित्रही येथे पाहायला मिळते.
जुन्या पुण्याची क्षणचित्रे बनलेल्या पाश्चात्त्यांच्या चित्रांच्या प्रतिकृती पाहताना 'आपलं पुणं एकेकाळी असं सुंदर होतं ?' असाच विचार मनात येतो. सवाई माधवराव पेशव्यांच्या दरबारच्या चित्राची प्रतिकृती, नाना फडणीस, सवाई माधवराव-महादजी शिंदे यांच्या एकत्रित चित्राची प्रतिकृती, १८५७ च्या उठावात भाग घेणाऱ्या व त्याचे नेतृत्व करणाऱ्या धोंडोपंत नाना म्हणजे नानासाहेब (दुसरे) पेशव्यांना पकडून देणाऱ्यास लाख रुपयांचे इनाम देण्याचे आश्वासन असणाऱ्या कंपनी सरकारच्या जाहीरनाम्याची प्रत यांचीही अमूल्य भर येथील वस्तुसंग्रहालयात पडली आहे.
श्रीमान जयंतराव खरे, श्रीमान भरतराव पटेल आणि अनेकांच्या कष्टांचे येथे चीज झाल्याचे जाणवते.
या सशुल्क संग्रहालयात सकाळी ७ - ते सायंकाळी ८ प्रवेश मिळतो. पर्वती हे पुण्याचे शिरोभूषण मानले, तर नव्याने साकारलेले पर्वतीवरील पेशवा संग्रहालय हा पर्वतीचा शिरपेच म्हणता येईल.
संदर्भ :
पुस्तक - पुण्याची पर्वती
लेखक - प्र. के. घाणेकर
Comments
Post a Comment