मस्तानी तलाव , पुणे
पुणे शहराच्या आजूबाजूला अशी बरीच ऐतिहासिक ठिकाणे आहेत जी कायम खुणावत असतात. पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला वडकी गावाजवळ असाच एक ठिकाण आहे, ज्याला ' मस्तानी तलाव ' या नावानं ओळखलं जातं. या तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची पत्नी मस्तानी हिचे नाव देण्यात आले आहे. दिवे घाटाच्या पायथ्याशी बांधलेला हा तलाव आजही आपल्या इतिहासाच्या खुणा जपून आहे. सध्या रस्ता झाल्याने जाणे देखील सुकर झाले आहे, त्यामुळे स्वतःची गाडी घेऊन जाणे कधीही उत्तम पर्याय आहे.
तसे पहायला गेले तर हे पेशवे काळातील एखादे छोटे धरण असावे कारण याची नीट रचना आपण पाहिली तर याला एक बंधारा आपल्याला पहायला मिळतो. दिवे घाटाच्या डोंगरातून पावसाचे पाणी येऊन हे सगळे पाणी या बंधाऱ्यामध्ये साठवले जाते. या बंधाऱ्याला सुंदर कामान देखील आहे. साधारणपणे जवळपास ६ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या तलावाच्या बंधाऱ्याची उंची ही जवळपास १५ फुट आहे .
तलावाच्या इथे आपल्याला एक भूयाराचे तोंड देखील पहायला मिळते. असं म्हणतात की या भुयारची दुसरी टोक शनिवारवाड्याला निघत असेल. तलावाला किनार्यावर लागून एक गणपती मंदिर आहे. या गणपतीच्या मंदिरातील मूर्ती अत्यंत सुरेख आहे. मंदिरांच्या प्रांगणात एका मूसकाची ( उंदीराची ) मूर्ती देखील आहे, ज्याचा तोंड गणपतीच्या मूर्तीच्या बाजूला आहे. या सुंदर ' मस्तानी ' तलावाजवळ आपल्याला एक शिवमंदिर आणि हनुमानाची मूर्ती देखील पहायला मिळते.
या मस्तानी तलावाच्या बांधकामासंबंधात आपल्याला एक ऐतिहासिक पत्र मिळते ते पत्र पुढीलप्रमाणे - ' मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीण इजकडे ठेविला '. अर्थात
बाजीराव पेशवे यांनी दिवे घाटाखाली तलाव बांधला आणि बाग तयार करून मस्तानीकडे सोपवण्यात आली अशी माहिती या नोंदीतून कळते. तेव्हापासून या तलावास मस्तानीचे नाव पडले असावे. या नोंदीमध्ये असलेल्या बागेचा आज कोठेही पत्ता मात्र लागत नाही. मात्र हे स्थळ अजूनही उपेक्षित आहे.
बाजीराव पेशवे यांनी दिवे घाटाखाली तलाव बांधला आणि बाग तयार करून मस्तानीकडे सोपवण्यात आली अशी माहिती या नोंदीतून कळते. तेव्हापासून या तलावास मस्तानीचे नाव पडले असावे. या नोंदीमध्ये असलेल्या बागेचा आज कोठेही पत्ता मात्र लागत नाही. मात्र हे स्थळ अजूनही उपेक्षित आहे.
असा हा ' वडकी ' गावाजवळील सुंदर ' मस्तानी तलाव ' नक्कीच भेट देण्यासारखा आहे !
Comments
Post a Comment